पंजाब डक यांचा हवामान अंदाज : पंजाबरावांनी महाराष्ट्रातील हवामानाबाबत दिली मोठी माहिती


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Havaman Andaj | राज्यातील शेतकऱ्यांसाठी आणि नागरिकांसाठी महत्त्वाची व कामाची बातमी समोर आलेली आहे. येत्या काही दिवसांमध्ये हवामान कसे राहील याबाबत ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव यांनी नुकताच एक हवामान अंदाज वर्तवलेला आहे.

पंजाबराव यांचा नेहमीप्रमाणे अंदाज खरा ठरत असतो. विशेषता यांचा अंदाज शेतकऱ्यांसाठी खास असतो. यामुळे शेतकरी त्यांच्या अंदाजावर विश्वास ठेवतात व असेही म्हटले जाते पंजाबराव शेतकऱ्यांचे मित्र आहेत आणि त्यांच्या अंदाजावर शेतकऱ्यांचा मोठा विश्वास आहे.

याच कारणामुळे शेतकरी बांधव पंजाबराव यांच्या हवामान अंदाजाकडे विशेष लक्ष ठेवून असतात. पंजाबराव यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरती अंदाज दिला की लगेच शेतकरी बांधव तो अंदाज पाहतात आणि शेतातील कामे करतात. अशातच त्यांच्या यूट्यूब व्हाट्सअप वरती त्यांनी शेतकऱ्यांसाठी एक नवीन हवामान अंदाज जाहीर केला आहे.

पंजाबराव डक यांनी दिलेला हवामान अंदाजानुसार 25 जानेवारीपासून ते 5 फेब्रुवारी पर्यंत हवामान कसे राहील या दरम्यान एक नवीन हवामान अंदाज वर्तवलेला आहे. याच संबंधित विषयावरती आपण सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

पंजाब डक यांचा नवीन हवामान अंदाज

पंजाबराव यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे येत्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रातील हवामान कोरडे राहणार आहे. 25 जानेवारी ते 4 फेब्रुवारी दरम्यान महाराष्ट्र पूर्णपणे कोरडे राहतील. तसेच 26 ते 27 या दिवसापासून राज्यामध्ये थंडीचा जोर वाढेल असे त्यांनी नमूद केले आहे. या दिवसांमध्ये महाराष्ट्रातल्या कुठल्याही भागांमध्ये पाऊस होणार नाही असे देखील त्यांनी सांगितले आहे.

तसेच पश्चिम महाराष्ट्र बाबत देखील त्यांनी हवामान अंदाज वर्तवलेला आहे. त्यांनी सांगितल्याप्रमाणे पश्चिम महाराष्ट्रामध्ये हवामान कोरडे राहणार असा अंदाज वर्तवला आहे. इथे देखील थंडीचा जोर हळूहळू वाढणार आहे.

मराठवाड्यात ही हवामान प्रामुख्याने कोरडे राहणार आहे. छत्रपती संभाजीनगर मध्ये प्रामुख्याने थंडीचा जोर वाढेल असा अंदाज पंजाब डक यांनी दिलेला आहे.

विदर्भात ही हवामान प्रामुख्याने कोरडे राहणार आहे. अमरावती नागपूर या विभागात 4 फेब्रुवारीपर्यंत थंडी वाढण्याची शक्यता आहे.

पंजाबराव डक यांनी दिलेला हवामान अंदाजाप्रमाणे राज्यामध्ये कुठेही अवकाळी पाऊस बसणार नाही असे त्यांच्या अंदाजामध्ये त्यांनी स्पष्ट केले आहे. राज्यातील हवामान प्रामुख्याने कोरडे राहील आणि थंडीचा जोर वाढणार आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!