पंजाब डक यांचा नवीन हवामान अंदाज: फेब्रुवारी महिन्यात होणार अवकाळी पाऊस, वाचा सविस्तर माहिती

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Havaman Andaj | ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाब डक यांनी नागरिकांसाठी व शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा एक हवामान अंदाज वर्तवलेला आहे. त्यांनी दिलेला अंदाजानुसार येत्या फेब्रुवारी महिन्यामध्ये हवामान कसे राहणार आहे. याबाबत मोठी अपडेट दिली आहे. तर पंजाबराव काय म्हणतात, आपण सविस्तर पाहणार आहोत.

पंजाबराव डक दरवेळी प्रमाणे शेतकऱ्यांसाठी नवीन अंदाज घेत असतात. यावेळीही शेतकऱ्यांसाठी पंजाबराव डक यांनी फेब्रुवारी महिन्यामध्ये कसे हवामान राहणार आहे. याबाबत नुकतेच सोशल मीडियाद्वारे नवीन हवामान अंदाज वर्तवलेला आहे.

खरे तर वर्षाचा शेवटचा महिना व वर्षाचा पहिला महिना अवकाळी पावसाने सुरू झाला आहे. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान केले आहे. तळ हाताच्या फोडा सारखे जपलेले पीक मातीमोल झाले. खरीप हंगामामध्ये कमी पावसामुळे पिक उत्पादन कमी झाले आणि त्यातच अवकाळी पावसाने आलेले पीक ही घालवले.

खरीप हंगामा मधील मुख्य पीक म्हणजे कापूस सोयाबीन हे पीक सुद्धा मातीमोल झाले, यावर्षी अपेक्षित असे उत्पादन ही मिळाले नाही. यामुळे शेतकऱ्यांचा आता संपूर्ण मदार रब्बी हंगाम पिकावर आहे. परंतु ढगाळ हवामान आणि अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील पीक देखील प्रभावित झाले आहे.

ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाब डक पुढील येत्या काळामध्ये हवामान कसे राहील, याबाबत एक नवीन हवामान अंदाज दिला आहे. व शेतकऱ्यांनाही हवामान कसे राहील हे जाणून घेण्याची उत्सुकता लागलेली आहे.

पंजाबराव डक काय म्हणतात

23 जानेवारीपासून हवामानामध्ये बदल होणार आहे. येत्या काळामध्ये हवामान प्रामुख्याने कोरडे राहणार आहे. येत्या काळामध्ये कोकण विभागात 25 जानेवारीपासून थंडीचा जोर वाढवण्याची शक्यता वर्तवली आहे.

तसेच पश्चिम महाराष्ट्र मध्ये ही 23 जानेवारीपासून ते पाच जानेवारीपर्यंत हवामान कोरडे राहील. इथेही 25 जानेवारीपासून थंडीचा जोर वाढणार आहे.

उत्तर महाराष्ट्र मध्ये 23 जानेवारी ते 25 फेब्रुवारी पर्यंत प्रामुख्याने हवामान कोरडे राहणार आहे. असा अंदाज ज्येष्ठ हवामानातज्ञ पंजाबराव डक यांनी वर्तवलेला आहे. व 25 तारखे नंतर या भागामध्ये थंडीचा जोर वाढणार आहे.

पंजाबराव यांनी सांगितल्याप्रमाणे पूर्व विदर्भामध्ये वर्धा, नागपूर, रामटेक, चंद्रपूर, यवतमाळ तसेच गोंदिया या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी ढगाळ हवामान राहिल व पावसाची शक्यता आहे. 25 जानेवारी नंतर हवामान देखील पूर्व पदावरील आणि थंडीचा जोर वाढणार आहे. असे पंजाबराव यांनी सांगितले आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!