Gram Market Price | शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. हरभऱ्याच्या दरामध्ये मोठी वाढ झालेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
हरभरा या पिकाची महाराष्ट्र मध्ये मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. परंतु यंदा राज्यामध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने हरभऱ्याची रब्बी हंगामामध्ये कमी पेरणी झाली आहे. त्यामुळे उत्पादनात घट येत असल्याने दरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याची सांगण्यात येत आहे. कोणत्या बाजार समितीमध्ये हरभऱ्याला सर्वाधिक दर मिळतो आपण ते जाणून घेणार आहोत.
या बाजार समितीमध्ये मिळतोय सर्वाधिक दर
19 फेब्रुवारी रोजी संगमनेर बाजार समितीमध्ये चार क्विंटल हरभऱ्याची आवक झाली इथे कमीत कमी पाच हजार सातशे ते जास्तीत जास्त 5700 तसेच सर्वसाधारण 5हजार 700 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला आहे.
मोर्शी बाजार समितीमध्ये 96 कुंटल हरभऱ्याची आवक झाली आहे. इथे कमीत कमी दर पाच हजार ते जास्तीत जास्त पाच हजार आठशे तसेच सर्वसाधारण पाच हजार चारशे रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला आहे.
वरोरा बाजार समितीमध्ये 390 क्विंटल हरभरा आवक झाली आहे. येथे कमीत कमी दर पाच हजार रुपये जास्तीत जास्त पाच हजार सहाशे साठ रुपये तसेच सर्वसाधारण 5400 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला आहे.
वरोरा खाबंडा बाजार समितीमध्ये 19 फेब्रुवारी 330 क्विंटल हरभऱ्याची आवक झाली आहे तसेच येथे कमीत कमी पाच हजार 450 रुपये ते जास्तीत जास्त 5750 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला आहे तसेच सर्वसाधारण पाच हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला आहे.
सावनेर बाजार समितीमध्ये १९ फेब्रुवारी रोजी 25 क्विंटल हरभऱ्याची आवक झाली आहे. येथे झालेल्या झालेल्या लिलावात कमीत कमी चार हजार चारशे ते जास्तीत जास्त 5293 तसेच सर्वसाधारण पाच हजार रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला आहे.