Agriculture Scheme : सरकार सातत्याने शेतकऱ्यांना आर्थिक मजबूत बनवण्यासाठी बऱ्याच काही असे योजना आखत असते. गेला काही दिवसांपासून देशातील शेती क्षेत्रात ड्रोन वापरा बाबतच्या योजनाबाबत मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा सुरू आहेत. शेतकऱ्यांनी सरकारकडून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये प्रोत्साहन दिले जात आहे. अलीकडे सरकारने शेतकऱ्यांना ड्रोन उपलब्ध करून देण्यासाठी ड्रोन दीदी योजना सुरू केली आहे. मात्र आता केंद्र सरकारने शेतकऱ्यांना ड्रोन खरेदीसाठी अनुदान योजना जाहीर केली आहे शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ होऊन त्यांचे जीवन समृद्ध होण्यासाठी केंद्र सरकारने हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.
शेतकऱ्यांना मिळणार अनुदान ( Subsidy to Farmers )
केंद्र सरकारची मिळालेल्या माहितीनुसार, कृषी प्रशिक्षण संस्था आणि कृषी महाविद्यालयांना ड्रोन खरेदीसाठी शंभर टक्के किंवा दहा लाख रुपयांपर्यंत अनुदान दिले जाणार आहे. याशिवाय शेतकरी उत्पादक कंपन्या एकूण दोन खर्चाच्या 75 टक्के अनुदान सरकारकडून उपलब्ध करून दिले जाणार आहे. यामध्ये अनुसूचित जाती अनुसूचित जमाती शेतकऱ्यांना अल्पभूधारक शेतकऱ्यांना महिला शेतकऱ्यांना आणि उत्तर राज्यातील शेतकऱ्यांना 50 टक्के किंवा पाच लाख रुपये पर्यंतचे अनुदान दिले जाणार आहे. ड्रोन खरेदीसाठी सरकारकडून 40% किंवा चार लाख रुपये पर्यंत अनुदान केंद्र सरकार उपलब्ध करून देणार आहे.
ड्रोन वापराचे फायदे ( Advantages of using drones )
उपलब्ध आकडेनुसार दरवर्षी देशातील पस्तीस टक्के पीक ही की कीर्तन आणि बुरशीच्या प्रादुर्भावामुळे खराब होत असते . ज्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागत आहे. परंतु अशा परिस्थितीत शेतकरी पारंपारिक पद्धतीने कीटकनाशकांची फवारणी करतात. ज्यामुळे शेतकऱ्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो. शेताची पिकांवर प्रभावीपणे किट नाशकांची फवारणी होत नाही. मोठ्या प्रमाणात औषधी वाया जातात. मात्र या उलट ड्रोने पिकांना औषध फवारणी केल्यास शेतकऱ्यांचे श्रम आणि पाणी औषधे खरेदीवरील खर्च कमी होऊ शकतो. व ड्रोने फवारणी केल्याने शेतकऱ्यांना थेट औषधांसोबत संपर्क येत नाही. त्यामुळे त्यांच्या जीविताला कोणताही धोका उद्भवत नाही. इतकेच नाही तर आठ ते दहा लिटर पाण्यामध्ये एका एकरची फवारणी पूर्ण होते असे सरकारी पातळीवरून दोन वापराबाबत माहिती मिळाली आहे.