Government Scheme Subsidy For Tractor Trolley | शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय ! आता ट्रॉलीसाठी मिळणार 50% अनुदान


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Government Scheme Subsidy For Tractor Trolley : राज्यामध्ये आता शेतकऱ्यांना व नागरिकांना एक आनंदाची बातमी आहे कारण त्यांना राज्य सरकारच्या कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत ट्रॉलीसाठी आता 50 टक्के अनुदान देण्यात येणार आहे. यांत्रिकरण या योजनेला आता गती मिळणार आहे. पहिले ट्रॉली अनुदान योजना लॉटरी उशिरा निघत असल्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त करत आहेत.

सध्या जिल्ह्यातंत्रीकरण योजनेचे 1807 लाभार्थी अपुऱ्या निधीमुळे अनुदानाच्या प्रतीक्षेमध्ये आहेत शेतकरी लाभार्थ्यांना विना विलंब ट्रॉली अनुदान मिळावे अशी विनंती करण्यात येत आहे. आता राज्यभर सरकारने कृषी यांत्रिकीकरण कार्यक्रम हा राबवला जात आहे कामगाराची कमतरता आणि अपुऱ्या मनुष्यबळामुळे शेतात यंत्रसामग्रीचा वापर खूप आवश्यक झाला आहे परिणामी शेतकऱ्यांना विविध प्रकारचे आधुनिक यंत्रे अनुदानित दारात उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विभागाने कृषी यांत्रिकरण योजना सुरू करण्यात आलेली आहे.

ट्रॉली अनुदान योजनेचा अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

कुठे करावा अर्ज.

यंत्रसामग्री आणि उपकरणासाठी तुम्हाला महाडीबीटी पोर्टल द्वारे अर्ज सादर करावे लागेल वैयक्तिक शेतकरी आणि महिला शेतकरी दोघेही अर्ज करण्यास प्रात्र राहणार आहेत याव्यतिरिक्त शेतकरी गट आणि शेतकरी उत्पादक कंपन्या व सरकारी संस्था देखील या योजनेत अर्ज करू शकतात.

कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार या वर्षापासून सर्वसाधारण गटाला ट्रॅक्टर ट्रॉली पंचवीस ते पन्नास टक्के अनुदान मिळणार आहे तर अनुसूचित जाती जमाती आणि इतर लहान आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदान मिळणार आहे. लहान आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना विविध गटा द्वारे ट्रॉलीसाठी 25 ते 50 टक्के अनुदान देण्यात येईल यांत्रिकरण योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले जात आहे या संधीचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टल द्वारे ऑनलाईन अर्ज सादर करावेत.

अशा सर्व सरकारी योजनेची माहिती जाणून घेण्यासाठी आजच आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा जेणेकरून तुम्हाला सरकारी योजनेची माहिती लवकरात लवकर मिळेल व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या पर्यायांचा वापर करा.

Leave a Comment

error: Content is protected !!