मोठी बातमी! इयत्ता आठवीपर्यंत ढकलपास आता बंद; १४ वर्षांनंतर सरकारकडून धोरणात बदल

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Government News | सरकारच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे. आता इयत्ता पाचवी व आठवीतील विद्यार्थ्यांची आता दरवर्षी परीक्षा होणार आहे. दरवर्षी शाळा स्तरावर परीक्षा होतेच पण पहिली ते आठवीपर्यंत कोणालाही नापास करायचे नाही असे धोरण आहे.

हे धोरण आरटीई अंतर्गत 2010 पासून सुरू आहे. व त्यात आता मोठा बदल करण्यात येणार असून पाचवी व आठवीतील विद्यार्थ्यांना वार्षिक परीक्षा पास होवीस लागेल अन्यथा त्यांना नापास झाल्याने त्याच वर्गात बसवे लागणार आहे.

राज्यातील शालेय शिक्षण विभागाने आरटीई ॲक्ट लागू करताना पहिली ते आठवीतील सर्वच विद्यार्थ्यांना पास करण्याचे धोरण स्वीकारले. त्यामुळे 2010 पासून आतापर्यंत पहिली ते आठवीतील एकही विद्यार्थी नापास झालेला नाही.

अशाच नवीन माहितीसाठी आजच आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

परंतु आता पुढे जाऊन अनेक विद्यार्थी इयत्ता दहावी बारावी अभ्यासक्रमात पिछाडीवर राहिले आणि अनेकांनी मधूनच शाळा देखील सोडण्याची उदाहरणे समोर आली. विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढावी त्यांना इंग्रजी, गणित, विज्ञान असे विषयांमध्ये सविस्तर माहिती समजावी या हेतूने आता इयत्ता पाचवी व आठवीतील विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात येणार आहे.

मराठी बातम्या जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

परंतु 2024-25 या शैक्षणिक वर्षापासून त्या वर्गातील विद्यार्थ्यांना शाळेच्या परीक्षेत पास व्हावेच लागणार आहे. नापास झालेल्या विद्यार्थ्याला आता पुढे पुढच्या वर्गात जाता येणार नाही. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण प्रसिद्धेकडून प्रश्न पत्रिकांचा नमुना तयार करण्यात आला आहे त्या धर्तीवर शाळांना प्रश्नपत्रिका काढाव्या लागणार आहेत.

वार्षिक परीक्षा नंतर तीस दिवसात पुन्हा संधी

इयत्ता पाचवी व आठवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांची वार्षिक परीक्षा पार पडल्यानंतर त्यात जे विद्यार्थी अनुत्तीर्ण तथा नापास झाले त्यांना पुन्हा एकदा संधी मिळणार आहे.

एका महिन्यानंतर त्यांचे पुन्हा एकदा शाळेत स्तरावर परीक्षा घेण्यात येईल त्यावेळी जे विद्यार्थी उत्तीर्ण होतील त्यांना नव्याने शैक्षणिक वर्षापासून पुढील वर्गात बसण्याची संधी मिळणार आहे. नापास होणारे विद्यार्थ्याला मात्र पुन्हा त्याच वर्गात बसावे लागणार आहे असा नवा बदल करण्यात आलेला आहे.

आगामी शैक्षणिक वर्षापासून नवीन बदलानुसार इयत्ता पाचवी व आठवीतील विद्यार्थ्यांना परीक्षेत उत्तीर्ण होणे आवश्यक राहणार आहे. दुसरी संधी देऊन अनुत्तीर्ण होणारे विद्यार्थ्यांना उत्तीर्ण होईपर्यंत त्याच वर्गात बसावे लागणार आहे. आता या दोन वर्गातील विद्यार्थ्यांना सरसकट पास करण्याची पद्धत बंद करण्यात येणार आहे.

Leave a Comment