Cotton Market Price : तुम्हाला तर माहीतच आहे. कापूस हे महाराष्ट्र मध्ये उत्पादित होणारे नगदी पीक आहे. याचे उत्पादन विदर्भ मराठवाडा खानदेश या भागामध्ये जास्त केली जाते. गुरुवारी जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरांमध्ये महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले आहे. यामध्ये महाराष्ट्र राज्य शेतकरी संघटनेच्या वतीने हे आंदोलन करण्यात आलेले असून कापूस पिकाला जास्त दर मिळावा आणि प्रलंबित विमा भरावे अशी मागणी करण्यात आली आहे.
चोपडा धरणगाव रस्त्यावर सुमारे दीडशे शेतकऱ्यांनी आंदोलन केले. त्यामुळे परिसरात मोठी वाहतूक कोणी झाली होती. शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत प्रशासन आणि पोलिसांना मागणीचे निवेदन दिले. मागणी या मान्य न झाल्यास आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
शेतकऱ्यांनी प्रशासनासमोर काही प्रमुख मागण्या मांडल्या आहेत. कापूस सारखा खरीप पिकांचे प्रलंबित पीक विमा त्वरित मंजूर करा, शेतमाला वरील निर्यात बंडी हटवा, प्रथम उसाचा गाळात दर तीन हजार रुपये प्रति क्विंटल निश्चित करा, कापूस उत्पादक शेतकऱ्यांना एकरी पन्नास हजार रुपये अनुदान द्या. केळी आणि पपई पिकांच्या किमतीत व्यापाऱ्यांच्या अन्यायकारक कपात थांबवा. अनुचित व्यापार व्यवहारातून गुंतलेल्या व्यापाऱ्यांवर कारवाई करा.
खर्च शेतकऱ्यांना पंधरा हजार रुपये भाव मिळणार का याकडे आता बारकाईने लक्ष लागून राहिले आहे त्यांना बऱ्यापैकी पाऊस न झाल्यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत आलेला आहे. विहिरीमध्ये आहे त्या पाण्यामध्ये शेतकऱ्यांनी कापूस पिकवले. परंतु त्यांना अपेक्षित असा भाव न मिळाल्यामुळे शेतकरी वर्ग मोठ्या चिंतेत दिसून येत आहे.