Gold Rate Today: सोन्याच्या दारात मोठी तेजी आली आहे. सराफा बाजारात आज सोन्याचा भाव, प्रति 10 ग्रॅम भाव 63 हजार पार झाला. पण, चांदीच्या दरात फारच घसरण झाली आहे. आज शुद्ध सोन्याचा भाव हा, प्रति 10 ग्रॅम 63,031 रुपयांवर खुला झाला आहे. या आधीच्या सत्रात हा दर 62,844 रुपयांवर बंद झाला होता. आज दरात 187 रुपयांची वाढ झाली आहे.
इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या माहितीनुसार, आज 24 कॅरेट सोन्याचा दर, प्रति 10 ग्रॅम 63,031 रुपये, 23 कॅरेट 62, 779 रुपये, 22 कॅरेट 57, 736 रुपये, 18 कॅरेट 47, 273 रुपये आणि 14 कॅरेट 36,873 रुपयांवर खुला झाला. तर चांदीचा दर प्रति किलो 74,693 रुपयांवर आहे. या आधीच्या सत्रात हा दर प्रति किलो 74,918 रुपये होता.
Gold Rate Today
2023 वर्षात सोन्याच्या दरात सुमारे आठ हजार रुपयांनी वाढ झाली आहे. तर चांदीचा दर प्रति किलो 68 हजारावरून आता 74 ,993 रुपयांवर गेला आहे.
मल्टी कमोडिटी एक्सचेंज वर मंगळवारी सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 63, 149 रुपयांवर खुला झाला. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर प्रति औंस 2,062.60 डॉलर वर आहे.
शुद्ध सोने कसे ओळखावे ?
सराफ बाजारात 24 कॅरेट सोने सर्वात शुद्ध समजलें जाते. मात्र, दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर केलां जातो. त्यात 91.66% सोने असते दागिन्यांच्या शुद्धतेसाठी हॉलमार्क संबंधित 5 चिन्हे असतात, 24 कॅरेट सोन्यावर 999 जर 22 कॅरेट सोन्याचा दागिना असेल. तर, त्यावर 916 21 कॅरेट दागिन्यांवर 875 आणि 18 कॅरेट सोन्याच्या दागिन्यावर 750 असे लिहिलेले असते. जर, दागिना 14 कॅरेट असेल. तर, त्यावर 585 असे लिहिलेले असते.
हे पण वाचा:-मंगळ राशीचा आज धनु राशीत प्रवेश, या 5 राशी असतील धनवान आणि या 4 राशीच्या लोकांच्या अडचणी वाढतील.