Gold Rate | गेलं काही दिवसांपासून कोणाच्या घरामध्ये सातत्याने वाढ होत आहे. सोन्याच्या किमती गगनाला भिडलेल्या आहेत. नागरिकांनी सोने कसे खरेदी करायचे असा प्रश्न पडला आहे. कारण सोन्याचे किमती दिवसेंदिवस वाढत चाललेले आहेत. गेल्या दोन महिन्यांमध्ये सोन्याचे दर तब्बल 11 हजार रुपयांनी वाढले आहेत. यामुळे सोने खरेदी करण्याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे.
सध्या वीकेंड आणि दुसरीकडे लग्नसराईचा काळ सुरू आहे. अशा मध्ये सोन्याचे दर गगनाला भिडलेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये सोन्याने चांदी खरेदी करावा की नाही असा प्रश्न सर्वसामान्यांना पडत आहे.
या कारणामुळे वाढले सोन्या-चांदीचे दर
सध्या सोन्याचांदीच्या दराबद्दल बोलायचं झाल्यास दर गगनाला भिडलेले आहेत. परंतु हा काळ सोन्या मध्ये गुंतवणूक करण्याचा सुवर्णकाळ मानला जात आहे. जेव्हा जागतिक स्तरावर हालचाल वाढते तेव्हा तणाव पूर्ण परिस्थिती निर्माण होते.
इजराइल हमास यांच्यानंतर आता इराण इजराइलमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम सोने चांदीचा दर वाढीवर दिसून येत आहे. या तीन महिन्यांमध्ये सोन्याचे किमती तब्बल १६ टक्के वाढलेले आहेत. त्यामुळे सोन्याचा भाव 74 हजार रुपये प्रति ग्रामवर पोचलेले आहे. तज्ञांच्या मते इराण आणि इजराइल यांच्यातील युद्धाने जागतिक स्तरावर मोठ्या हालचाली निर्माण झालेल्या आहेत. त्यामुळे सोन्याचे दर गगनाला भिडलेले आहेत.
आजचा सोन्याचा दर
22 कॅरेट बद्दल बोलायचं झाल्यास आज 22 कॅरेट सोन्याची दहा ग्रॅम ची किंमत 73 हजार 130 रुपये आहे. तर सराफ बाजारामध्ये अधिकृत मिळालेल्या माहितीनुसार चांदी 83 हजार 850 रुपये प्रति किलोने विकली जात आहे.
महाराष्ट्रातील महानगरातील सोन्याचे दर
मुंबईमध्ये 22 कॅरेट सोन्याचा प्रति दहा ग्रॅम चा दर ६६ हजार ९०८ रुपये आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा दर 72 हजार 990 रुपये प्रति दहा ग्राम इतका आहे. तसेच पुण्यामध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 66 हजार 918 इतका आहे. आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 72 हजार 990 आहे. तर नागपूर मध्ये 72 हजार 9990 रुपये इतका आहे. तर नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 66 हजार 908 रुपये व 24 कॅरेट सोन्याचा प्रतिभा ग्रामचा दर 72 हजार 990 रुपये इतका आहे.