Gold Price Today | नागरिकांसाठी एक महत्त्वाची व टेन्शन वाढवणारी बातमी समोर येत आहे. मध्यंतरी सोन्याच्या दर खूपच वाढलेले आहे. पुन्हा एकदा सोन्याच्या दरामध्ये वाढ होत असताना नागरिकांचे डोकेदुखी वाढत आहे. लग्नसरा सुरू असताना सोन्याचा दर वाढत असल्यामुळे नागरिकांना मोठ्या महागाईच्या जागा सहन करावा लागत आहेत.
दोन दिवसापूर्वी नवीन आर्थिक वर्ष सुरू झालेले आहे. तसेच सोन्या-चांदीच्या दरातही तेजी आली आहे. सोन्याच्या भावात एका दिवसात 900 रुपयांची वाढ झाल्यामुळे सोन्याची किमती 69 हजारांचा टप्पा ओलांडला आहे.
सध्याचे दर पाहता येत्या काही दिवसांमध्ये सोन्याचे दर प्रतितोळा 75 हजार रुपयांची पातळी गाठणार असा अंदाज तज्ञांच्या माध्यमातून व्यक्त केला जात आहे. त्यामुळे लग्नसरायसाठी मोठे सोने खरेदी विचार करत असलेल्या सामान्य नागरिकांसाठी चिंता वाढवू लागली आहे.
रिझर्व बॅंकेकडून येत्या आगामी काळामध्ये व्याजदर कमी होण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम म्हणून आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये गुंतवणूकदारांची सोन्यामध्ये गुंतवणूक वाढायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे जागतिक पातळीवर सोन्याचे दर खूपच वाढत आहेत.
सोन्याचे दर जाणून घ्या
मार्च एंडिंग नंतर आता नवीन आर्थिक वर्ष सुरू झालेले आहेत. चांदीच्या किमती मध्ये देखील मोठी वाढ झालेली आहे. तसेच सोन्याच्या किमतीमध्ये देखील मोठी वाढ झालेली आहे. सोन्याच्या दरामध्ये तब्बल 900 रुपयांनी तर चांदीच्या किमतीमध्ये पाचशे रुपयांनी वाढ झाली आहे. यामुळे सोन्याचे दर आता दहा दहा ग्रॅम 69 हजार 400 रुपये आहे. तर जीएसटी सह 71 हजार 482 रुपये झालेले आहेत. तर चांदीचे 76 हजार रुपये प्रति किलो वर पोहोचले आहे.
तसेच गेल्या महिन्याभरामध्ये सोन्याचे दर सहा हजार तीनशे रुपयांनी वधारले आहे. एक मार्च 2024 ला सोन्याचे दर 63 हजार 100 रुपये होते. तर आता तो दर 69,400 पर्यंत आला आहे.
सध्या तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर या 9 एप्रिल गुढीपाडवा यामुळे तर तुम्ही सोने खरेदी करण्याच्या करत असाल पण सोन्याच्या दर वाढणार आहे हे जवळपास निश्चित आहे. परंतु सध्या 70 हजार पर्यंत आसपास असलेले सोनी प्रति तोळा गुढीपाडव्यापर्यंत 75000 वर जाणार असे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे.