Gold Price Today | सध्या देशभरामध्ये लग्न सरांचा हंगाम सुरू आहे. अशातच सोन्याच्या दर दिली भिडलेले असताना नागरिकांना मोठा महागाईच्या झळा सहन करावा लागत आहे. तसेच या पुढल्या महिन्यामध्ये गुढीपाडवा सण येणार आहे. व त्यानंतर अक्षय तृतीयेचा मोठा सण येणार आहे. या परिस्थितीमध्ये सध्या सराफ बाजारामध्ये मोठी रेलचेल पाहायला मिळत आहे.
सध्या लग्नसराचा हंगाम सुरू असताना बाजारामध्ये सोन्याचा दराने विक्रम मोडला आहे अशा मध्ये सोन्याचा दर सध्या चढ-उतार होत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये सोने खरेदी करण्याबाबत सातत्याने संभ्रम निर्माण होत आहे. परंतु येत्या आगामी काळामध्ये सोन्याचे दर आणखी कडकनार अशी माहिती तज्ञांनी वर्तवली आहे.
तज्ञांच्या मते सोने खरेदी करण्याची सर्वोत्कृष्ट वेळ असल्याचा दावा केला आहे. बाजारामध्ये तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार सोन्याच्या किमती लवकरच 72 हजार रुपये ते 75 हजार रुपये प्रति दहा ग्रॅम वर पोहोचण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
आजचा सोन्याचा दर Today’s Gold Rate
आज राजधानी दिल्ली येथे 24 कॅरेट सोन्याची किंमत 69 हजार 40 रुपये एवढी नमूद करण्यात आलेली आहे. तसेच अक्षय तृतीया पर्यंत यामध्ये पाचशे रुपयांची घसरन होण्याची शक्यता आहे.
तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार अक्षय तृतीयेपर्यंत सोन्याचे दर 68 हजार रुपये असू शकतात. परंतु अक्षय तृतीये 10 मे ला आहे. मात्र यानंतर सोने आणखी कडकणार आहे 29 ऑक्टोबरला धनत्रेश आहे.
यावेळी सोन्याची किमती 72 हजार रुपये प्रति दहा ग्राम वर पोहोचणार अशी शक्यता सराफ बाजारातील तज्ञांनी व्यक्त केली आहे. सोन्याचे किमती वाढ होण्याचे प्रमुख कारण म्हणजे किरकोळ खरेदी मोठ्या प्रमाणात वाढले आहे. तसेच रिझर्व बँकेने सोने खरेदीवर भर दिलेला आहे.