Gold Price Today | नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. तुम्ही जर सोने खरेदी करण्यात विचार करत असाल तर तुमची डोकीदुखी नक्कीच वाढणार आहे. कारण मध्यंतरी सोन्याच्या दरामध्ये स्थिरता दिसून आली. परंतु आता सोन्याच्या दर गगनाला भिडलेले आहे दर पाहून येईल तुम्हाला चक्कर.
या महागाईच्या झळा झळ्या नागरिकांना मोठा प्रमाणात सहन करावा लागत आहेत. कारण सोन्याचे किमती पुन्हा एकदा 67 हजाराचा टप्पा पार केला आहे. सोन्याच्या दाराने मोठी उसळी घेतल्याने नागरिकांचे तोंडचे पाणी पळाले.
मागच्या काही दिवसापासून सोन्याच्या दारामध्ये सातत्याने वाढ सुरू आहे दुसरीकडे चांदीचे दर देखील वाढत पाहायला मिळत आहेत. 21 मार्चपासून सोन्याचे किमतीने रेकॉर्ड ब्रेक केला आहे. सध्या सोन्याचा दहा ग्राम चा भाव 67 हजार तीनशे रुपये वर गेला आहे. तसेच त्यानंतर सोन्याच्या दारामध्ये सातशे रुपयांची घसरण पाहायला मिळाली होती. परंतु सोन्याचे दर पुन्हा एकदा वाढलेले आहेत सध्या सोन्याचे दर 66 हजार 600 रुपयांवर आलेले आहेत.
या आठवड्यामध्ये सोन्याच्या दरामध्ये पुन्हा वाढ झालेली असून सोमवारी सुट्टीनंतर मंगळवारी सोने 300 रुपयांनी वाढ तर बुधवारी दोनशे रुपये वाढ दिसून आली. त्यामुळे आज गुरुवारी सकाळचे सत्रा मध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव 67 हजार रुपये प्रति दहा ग्राम आहे. तर दुसरीकडे चांदीच्या दारात चड उतार दिसून येत आहे. सध्या एक किलो चांदीचा दर 75 हजार रुपये इतका आहे.