Gold Price 6 March 2024 | नागरिकांसाठी महची बातमी समोर येत आहे. सध्या लग्नसरा सुरू झाला असताना सोन्याच्या किमती दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. मागच्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमती कमी झाल्या होत्या. त्यावेळेस नागरिकांना काहीसा दिलासा मळाला. परंतु सोन्याच्या किमती दिवसान दिवस वाढत आहेत. त्यामुळे नागरिकांना मोठा महागाईच्या झळा सहन करावा लागत आहे.
या चालू आर्थिक वर्षाच्या अखेरीस मार्चमध्ये मौल्यवान धातूच्या किमती वाढण्याचा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. सोन्याच्या किमतीत आत्तापर्यंत मोठी झेप घेतली आहे. यामुळे ज्या नागरिकांना खरेदी करायचे होते त्यांना मोठा झटका बसला आहे. व येत्या काळामध्ये सोन्याचे किमती 70 हजार ते 75000 च्या घरात पोहोचणार असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
आंतरराष्ट्रीय पातळीवर सोन्याच्या भावामध्ये मोठी वाढ झालेली आहे. एका दिवसामध्ये 850 रुपयांनी वधारले. यामुळे अनेक शहरामध्ये सोन्याचे भाव उंच्चाकी पातळीवर थेट 64 हजार सातशे रुपये प्रति तोळावर पोहोचले आहेत.
तसेच मोठ्या शहरांमध्ये चांदीच्या भावात सातशे रुपयांनी घसरण होऊन ती 72 हजार 800 रुपये प्रति किलो वर आली. दोन मार्चपासून सोन्याचा भाव मध्ये वाढ सुरू झालेली आहे. दोन मार्च रोजी 650 रुपये सोन्याच्या दरत वाढ झाली. सोने 63 हजार 750 रुपयावर पोहोचले सोमवारी आणि मंगळवारी तेजी कायम राहिली.
तसेच सध्याचे अंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडीमुळे सोने 70000 च्या घरात जाण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे चांदी पण चमकणार आहे. गेल्या दोन-तीन दिवसापासून सोन्याच्या दारात जवळपास 1000 ते 1100 रुपयांचे वाढ झालेली आहे. दुसरीकडे चांदीच्या विधारात 1000 रुपयांनी वाढ झाली असल्याचे दिसून येत आहे.