FD Return : आताच्या काळात अनेक जण चांगल्या भविष्यासाठी स्वतः जवळ असलेले पैसे कुठेतरी इन्वेस्ट करीत आहेत. पण काही जणांना सुरक्षित गुंतवणूक कुठे करायची याची पुरेशी माहिती नसते. तसेच गुंतवणुकीवर कोणती बँक जास्त व्याजदर देते हे देखील माहित नसते.
मागील वर्षी मे 2022 मध्ये देशातील सर्वात मोठी बँक रिझर्व बँक ऑफ इंडिया रेपो दर वाढवण्यास सुरुवात केली होती. तेव्हापासून बँकेने FD वरील व्याजदर झपाट्याने वाढवली आहे.
FD व्याजदर गेला दोन वर्षात सर्वाधिक वाढलेले दिसून आले आहे. एफडी मध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना कमी व्याजदरात पैसे जमा करावे लागत होते पण आता बँक ग्राहकांनी सुटकेचा निश्चय सोडला असल्याचे दिसून येते. एफडीचे काही कालावधी वर बँक 9 % हून अधिक देत आहे.
आज तुम्हाला काही अशा बँकेबद्दल माहिती देणार आहोत ज्या एका वर्षात एफडीवर 7% ते 8 %आणि त्याहून अधिक व्याज देत आहे. त्यामध्ये सार्वजनिक व खाजगी अशा बँकेचा समावेश होत आहे.
या बँका देत आहे सर्वाधिक व्याज :
Ujjivan small finance Bank : या बँकेमध्ये जर तुम्ही एक वर्षासाठी करीत आहात तर ही बँक ८.२५० टक्के दराने व्याज देणार आहे.
Equitas small finance Bank : या बँकेमध्ये एक वर्षे एफडीवर 8.2% इतके व्याजदर आहे. व वृद्धांना जास्त व्याजदर देण्याची योजना या बँकेमध्ये उपलब्ध आहे.
Utkarsh small finance Bank : ही बँक देखील एक वर्षे एफडीवर आठ टक्के इतके व्याजदर देत आहे.
Fincare small finance Bank : ही बँक ग्राहकांना सात वर्षाच्या एफडीवर 7.65 टक्के दराने व्याजदर देत आहे. व ज्येष्ठ नागरिकांसाठी अधिक व्याजदर दिले जाणार आहे.
capital small finance Bank : ही बँक ग्राहकांना 7.5 टक्के इतके व्याजदर देणार आहे यासाठी ग्राहकांना एक वर्षासाठी FD करावी लागणार आहे.
State Bank of India : ही बँक भारतातील एक प्रमुख बँक आहे जेणेकरून या बँकेमध्ये FD केल्यास सुरक्षित आहे .व ही बँक एफ डी वर 7%टक्के इतके व्याजदर देत आहे.