FD Interest rate : मित्रांनो जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तुम्ही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर पोस्ट ऑफिस टर्म्स डिपॉझिट स्कीम किंवा स्टेट बँक ऑफ इंडिया ची एफडी स्कीम तुम्हाला तीन वर्षात अधिक फायदे देते? ते आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
जर तुम्ही पोस्ट ऑफिस टर्म्स डिपॉझिट स्कीम आणि एसबीआयचे स्कीम मध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला सांगतो कुठे जास्त परतावा मिळत आहे.
सरकारने नुकतेच पोस्ट ऑफिस मुदत ठेव योजनेच्या व्याजदरात 10 आधार अंकांची वाढ केली आहे. अशा स्थितीत तीन वर्षाच्या कालावधीमध्ये सात टक्क्या ऐवजी 7.10 टक्के व्याजदराचा लाभ मिळतो.
पोस्ट ऑफिस चे नवीन दर एक जानेवारी 2024 ते 31 मार्च 2024 पर्यंत लागू करण्यात आलेले आहेत.
स्टेट बँकेने 27 डिसेंबर २०२३ रोजी त्यांच्या दोन कोटी रुपयांपेक्षा कमी एफडी योजनेवरील व्याजदरात वाढ जाहीर केली आहे पैकी नि वेगवेगळ्या कालावधीच्या एफडी वरील दरात 25 पॉईंट्स ने वाढ केली आहे.
बँक तीन ते पाच वर्षाच्या कालावधीसाठी एफडीवर वर 6.75 व्याजदर देत आहे हे दर सर्वसामान्य नागरिकांना देण्यात येत आहे.
पोस्ट ऑफिसच्या मुदत ठेव योजनेवर ग्राहकांना जास्त व्याजदराचा लाभ मिळत आहे .