Farmers Information: नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यातील हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी हवाना बरोबर शेतकऱ्यांना सोयाबीनची पेरणी करताना कोणत्या गोष्टीची काळजी घेणे गरजेचे आहे. पंजाबराव आणि शेतकऱ्यांना सोयाबीनची पेरणी करताना काही महत्त्वपूर्ण गोष्टीचे काळजी घेतली पाहिजे त्याचा कृषी सल्ला दिला आहे.
हे सोयाबीनचे वाण आहे सर्वात जास्त उत्पन्न देणारे ! एकरी 20 क्विंटल उत्पन्न
महाराष्ट्र राज्यात शेतकरी सोयाबीनला पिवळे सोने म्हणून ओळखतात, राज्यात मराठवाड्यात व विदर्भात या भागात सोयाबीनचे उत्पादन सर्वात जास्त प्रमाणात घेतले जाते. सोयाबीन पिके एक नगदी पीक असून शेतकरी सोयाबीन लागवडीला सर्वात प्रथम प्राधान्य देत आहेत. आता रब्बी हंगाम संपला आहे व खरीप हंगाम सुरू झाला आहे.
राज्यात सोयाबीन पिकाची लागवड प्रामुख्याने खरीप हंगामात केली जाते. राज्यातील बहुतांश शेतकरी उन्हाळी सोयाबीनचे पीक घेत नाहीत. उन्हाळी सोयाबीनचे पीक अधिक घेत नसल्यामुळे जास्तच जास्त शेतकरी खरीप हंगामामध्येच सोयाबीन ची लागवड करतात. Farmers Information
रेशन कार्ड धारकांसाठी महत्वाची बातमी, 15 जून पर्यंत हे काम न केल्यास शिधापत्रिकेवरील धान्य होणार बंद..!
खरीप हंगामात सोयाबीन पिकाची लागवड करताना विशेष कोणत्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे. याचा महत्त्वपूर्ण सल्ला कृषी सल्लागार शेतकऱ्यांना पंजाबराव डख यांनी दिला आहे. पंजाबराव यांनी याबद्दल काय माहिती दिली आहे ते आपण सविस्तर जाणून घेऊया.
पंजाबराव डख यांचा कृषी सल्ला काय आहे?
- सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनो जर तुम्ही जून महिन्यात सोयाबीनची लागवड करत असाल तर तुम्ही उशिरा हार्वेस्टिंग साठी तयार होणाऱ्या सोयाबीन ची निवड करण्याचा सल्ला पंजाबराव डख यांनी दिला आहे.
- जुलै महिन्यात सोयाबीनची पेरणी करणार असाल तर कमी कालावधीत येणाऱ्या वाणाची निवड करण्याचा सल्ला यावेळी त्यांनी दिला आहे.
पीएम किसान योजनेच्या 17 व्या हप्त्याचे 2000 रुपये जून महिन्याच्या याच तारखेला होणार जमा!
- पंजाबराव डख यांच्या मते, आपल्याकडे जेव्हा सोयाबीन पीक हार्वेस्टिंग साठी तयार होते असतात तेव्हा अतिवृष्टी होते व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते.
- सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या योग्य वनाची निवड करून सोयाबीनची पेरणी करावी. असे पंजाबराव डख हे म्हटले आहेत.
- पेरणीसाठी उत्तम वाहन म्हणजे ग्रीन गोल्ड 3344 या वाणाच्या शेंगा कितीही अतिवृष्टी किंवा पाऊस झाल्यास फुटत नसल्याचे पंजाबराव डख यांनी सांगितले आहे.
शेतकरी मित्रांनो तुम्ही देखील सोयाबीन पेरणी करण्याचा विचार करत असाल तर पंजाबराव डख यांनी सांगितल्याप्रमाणे सोयाबीनची पेरणी करताना या सर्व छोट्या-मोठ्या गोष्टींकडे लक्ष देऊन सोयाबीनची पेरणी करावी. जेणेकरून भविष्यात होणाऱ्या नुकसानीपासून बचाव होऊ शकतो.
Susann Bonvouloir