Farmer News: नमस्कार शेतकरी मित्रांनो, देशाचे नवे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी पदभार स्वीकारला आहे. पदभार स्वीकारल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांसाठी मोठे गिफ्ट दिले आहे. काय आहे नरेंद्र मोदी सरकारचा पहिला निर्णय याबद्दल सर्व सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.
नरेंद्र मोदी यांनी भारताचे तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान किसान निधीचा सतराव्या त्याला मंजुरी दिली आहे. पंतप्रधान यांनी पदभार स्वीकारताना निधी मंजुरीची फायलीवर पहिली सही केली आहे. वीस हजार कोटीच्या निधी या योजनेसाठी मंजूर करण्यात आला आहे. याचा थेट फायदा 9.3 कोटी शेतकऱ्यांना होणार आहे. Farmer News
मोदी सरकारचा पहिला निर्णय!
देशाचे नवे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा शपथ घेतली आहे. एनडीए सरकारचा शपथविधी सोहळा पार पडला आहे. त्यानंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या कार्यालयात पदभार स्वीकारला त्यावेळी त्यांनी प्रधानमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर पी एम किसान निधीच्याच्य 17 व्या हप्त्याला मंजुरी देण्याच्या फायलीवर सही केली. यामुळे 9.3 कोटी शेतकऱ्यांना फायदा होईल आणि सुमारे वीस हजार कोटी रुपयांची वाटप करण्यात येणार आहे.
मोदी सरकार शेतकऱ्यांसाठी!
किसान कल्याणासाठी आमचे सरकार पूर्णपणे वचनबद्ध आहे. त्यामुळे पदभार स्वीकारल्यानंतर स्वाक्षरी केलेले फाईल पहिली शेतकऱ्यांसाठी संबंधित आहे. आम्हाला पुढील काळात शेतकऱ्यांनी कृषी क्षेत्रात आणखी खूप मोठे काम करायचे आहे. असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळेस म्हणाले.