E-Ration Card Download प्रत्येकाला मिळणार ई – रेशनकार्ड; आता मोबाईल मध्ये ठेवा राशन कार्ड,


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

E-Ration Card Download :-पुरवठा विभागामार्फत रेशन कार्ड धारकांना या अगोदर हस्तलिखित रेशन कार्ड देण्यात येत होते. शासन निर्णयानुसार आता प्रत्येक रेशन कार्डधारकांना ई – रेशनकार्ड भेटणार आहे. त्यामुळे रेशन कार्ड धारकांना आता मोबाईल मध्ये रेशन कार्ड ठेवता येईल. रेशनकार्ड धारकांना ई-रेशन कार्ड वाटप करण्याचे काम पुरवठा विभागामार्फत चालू होणार असल्याचे कळते.

आता प्रत्येकालाच मिळणार ई-रेशन कार्ड (ई – शिधापत्रिका)

रेशन कार्डधारकांनी संबंधित वेबसाईटवर ऑनलाईन पद्धतीने माहिती भरल्यानंतर ती माहिती संबंधित पुरवठा निरीक्षकाकडे मिळणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर रेशन कार्ड धारकांना ई – रेशन कार्ड भेटणार आहे. यामुळे सरकारच्या या निर्णयाचा सर्वत्र स्वागत होत आहे.

ई-रेशन कार्ड चे फायदे व वापर कसा करायचा?

ई – रेशन कार्ड व्यवस्थापन प्रणाली मार्फत राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेच्या लाभार्थ्यांकरिता QR Code आधारित ई – रेशन कार्ड ऑनलाइन व डाउनलोड करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ई – रेशन कार्ड वर योजनेबाबत अंत्योदय अन्न शिधापत्रिका (AAY), प्रधान्य कुटुंब योजना (PHH) आणि राज्य योजनेअंतर्गत APL Farmer, राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत (NPH) असे नमूद करण्यात येणार आहेत. त्या अनुषंगाने ई – रेशन कार्ड (ई – शिधापत्रिका) सुविधा साठी शासन फी आकारणार नाही असा निर्णय शासनाने घेतला.

E-Ration Card Download: राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेचे व राज्य योजनेच्या शिधापत्रिका धारक हे गरीब व गरजुवंत कुटुंबातील लोक आहेत. त्यामुळे राष्ट्रीय अन्नसुरक्षण योजनेच्या व राज्य योजनेच्या शिधापत्रिकाधारकांना सर्वांनी वितरण व्यवस्थेअंतर्गत ऑनलाइन रेशन कार्ड सुविधा/सेवा शुल्क न करता सदरील योजनेची सुविधा मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

अर्जदार यांनी ई – रेशन कार्ड साठी ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर प्रचलित कार्यपद्धतीनुसार तपासणी करून योजनेनुसार ऑनलाइन ई – रेशनकार्ड (ई – शिधापत्रिका) उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

ई – रेशनकार्ड कधी मिळणार?

रेशन कार्ड धारकांना 1 सप्टेंबर पासून ई – रेशन कार्ड वाटप करण्यात येणार आहे. यासंदर्भात जिल्हा पुरवठा अधिकारी कार्याला मार्फत तहसीलदार पुरवठा निरीक्षकांना आदेश देण्यात आले आहेत.

E-Ration Card Download करण्यासाठीं इथे क्लिक करा

हे पण वाचा :-

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.

Leave a Comment

error: Content is protected !!