E-pik inspection : महाराष्ट्र सरकार द्वारे गेल्या तीन वर्षापासून राबवत असलेले ई – पिक पाहणी उपक्रम शेतकरी वर्गामध्ये सध्या बरीच चर्चा सुरू आहे. या उपक्रमाद्वारे शेतकऱ्यांना शासकीय अनुदान नैसर्गिक आपत्ती किंवा शेत पिकाचे नुकसान झाल्यास सरकार द्वारे आर्थिक मदत दिली जाते. परंतु बऱ्याच शेतकऱ्यांना माहीत नसते की ई- पिक पाहणी कशाप्रकारे करावी. तर अशाच गोष्टीची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन आलेलो आहोत हा लेख शेवटपर्यंत काळजीपूर्वक वाचा तुम्ही तुमच्या मोबाईलद्वारे कुठल्याही अधिकाराचे आधार न घेता तुम्ही तुमच्या पिकांचे ई – पिक पाहणी करू शकता चला तर मग जाणून घेऊया
ई पिक पाहणी कशी करायची ?
शेतकरी मित्रांनो तुमच्याकडे अँड्रॉइड मोबाईल असेल तर प्ले स्टोर वरून ई – पिक पाहणी ॲप डाऊनलोड करावा लागणार आहे. तर प्ले स्टोअर वर गेल्यानंतर तुम्हाला तिथे इंग्लिश की वर्ड्स मध्ये E-PEEK PAHANI असं सर्च करायचं आहे त्यानंतर तिथे दिलेल्या इन्स्टॉल बटनावरती क्लिक करून ते एप्लीकेशन तुमच्या मोबाईल वरती डाऊनलोड करून घ्यायचा आहे.
- डाउनलोड झाल्यानंतर ओपन या पर्यायावर क्लिक करायचा आहे.
- त्यानंतर ई – पिक पाहणी नावाचे पेज तुमच्यासमोर दिसेल याला डावीकडे सरकवल्यास हे ॲप वापरण्यासाठी लागणारी माहिती तिथे तुम्हाला दिलेली असेल.
- अजून एकदा डावीकडे सरकवल्यास पिकाचे नोंदणी करण्यासाठी ज्या बाबीची मदत त्या दिलेल्या असतील जसे की सातबारा उतारा ८अ इत्यादी गोष्टी.
- त्याच्यानंतर तुमची महसूल विभाग निवडायचे आहे.
- व त्यानंतर नवीन नोंदणी या पर्यावर क्लिक करायचे आहे.
- इथे सुरुवातीला विभाग जिल्हा तालुका आणि तुमच्या गावाचे नाव निवडून पुढे जायचं आहे.
- मग पहिले मधलं किंवा आडनाव तसंच खाते क्रमांक किंवा तुमचे गट क्रमांक टाकून तुम्ही खातेदार निवडू शकता.
- दिलेल्या गट क्रमांक या पर्यायावर क्लिक करून खाली तो क्रमांक टाकायचा आहे आणि मग शोधा या पर्यायावर क्लिक करायचा आहे.
- यानंतर तुमच्यासमोर संकेताक पाठवा या नावाचे पेज ओपन होईल.
- आपली नोंदणी खालील दिलेल्या मोबाईल क्रमांकावर करण्यात येत आहे अशी सूचना तिथे दिलेली असेल.
- जर तुम्हाला नंबर बदलायचा असेल तर मोबाईल क्रमांक बदला हे बटन दाबा नंतर तुम्हाला जो नंबर टाकायचा आहे तो नंबर टाका आणि पुढे जा या बटणावर क्लिक करा.
- जर तुम्ही गेल्या वर्षी या ॲपवर नोंदणी केलेली असेल तर तुमची नोंदणी आधी झालेली आहे तो मला पुढे जायचे का असा मेसेज तिथे येईल पण तुम्ही यंदा पहिल्यांदाच नोंदणी करत असाल तर तसा मेसेज येणार नाही.
- दिलेल्या हो पर्यावर क्लिक करा.
- आता तुमचे नाव निवडा संगीता विसरलात या पर्यावर क्लिक क्रमांक संकेतिक क्रमांक टाका समजा ब्लॅक स्क्रीन आली तर मग होम पेज या पर्यावर क्लिक करा.
- आता पीक पाहणी चे ॲप वर तुम्ही नोंदणी करू शकता इथे पीक नोंदणी करा असे पर्याय दिसेल तिथे क्लिक करायचा आहे मग खाते क्रमांक गट क्रमांक निवडायचा आहे लागवडीखालील जमिनीचे एकूण क्षेत्र आणि पोट खराब क्षेत्र तिथे आपोआप येईल.
- पुढे खरीप हंगाम निवडून पिकाचा वर्ग जसा की निर्भेळ पीक आहे की मिश्र पीक आहे तेव्हा इतर ते निवडायचे आहे त्याचा प्रकार पिकाचे नाव आणि क्षेत्र हेक्टर आर मध्ये टाकायचे आहे.
- दिलेली माहिती संपूर्ण भरून झाली की पुढील जलसिंचन साधन जसे की विहीर तलाव हे निवडायचे आहे त्यानंतर सिंचन पद्धतीची लागवड तारीख निवडायची आहे.
- पुढे अक्षांश रेखांश मिळवा या पर्यायावर क्लिक करायचे आहे आणि मग शेवटी फोटो काढल्यानंतर तुमच्या पिकाचा फोटो अपलोड करायचा आहे हा फोटो तुम्हाला तुमच्या शेतातून अपलोड करावा लागेल तुम्ही स्वतः तुमच्या बांधावर जाऊन तुमच्या पिकांचे फोटो काढून अपलोड करू शकता.
- फोटो काढून झाले की बरोबरच्या दिलेल्या खुणेवर क्लिक करायचा आहे त्यानंतर जी माहिती भरली आहे ती तुमच्यासमोर दाखवली जाईल त्या खालच्या स्वयंघोषनेवर तुम्हाला टिक करून पुढे जायचं आहे.
- पिक माहिती साठवलेली आणि अपलोड झालेली आहे अशी तिथे सूचना देण्यात येईल. ठीक आहे या पर्यायावर क्लिक करा
- तुम्ही नोंद केलेल्या त्यांची माहिती पाहण्यासाठी पिक पिकांची माहिती पहा या पर्यायावर क्लिक करून तुम्ही भरलेली माहिती पाहू शकता.
- जर दुसऱ्या गटामधील पिकांची नोंदणी करायची असेल तर अशाच सांगितल्या प्रक्रिया द्वारे पुन्हा करू शकता.
- सगळ्यात शेवटी अपडेट या पर्यायावर क्लिक करून संपूर्ण माहिती अपलोड करायची आहे.
- अशाच प्रकारे या ॲपवरून तुम्ही कायम फळ बांधावरची झाडेही नोंद करू शकतात तसेच गावातील खातेदारांची पीक पहाणीची ची माहिती भरू शकतात.
ही माहिती जर तुम्हाला आवडले असल्यास आपल्या शेतकरी बांधवांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही त्यांच्या पिकांची नोंदणी करणे सोपे होईल धन्यवाद