Thursday

13-03-2025 Vol 19

PAN Card, हारवलं असलं तरी टेन्शन नाही सहजरीत्या डाऊनलोंड करू शकतां.e-Pan पहा माहिती

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

e-Pan Card: आपल्या आर्थिक व्यवहारांसाठी पॅन कार्ड आवश्यक आहे. जर तुमचं पॅन कार्ड हरवला असेल, तर टेन्शन घ्यायची गरज नाही. कारण तुम्ही डिजिटल पॅन कार्ड वापरू शकता. आणि ते आपल्या मोबाईल मध्ये सेव करून सुद्धा ठेवू शकता. या ईपॅन असे म्हणतात. ते इन्कम टॅक्स किंवाNSDL वेबसाईटवर जाऊन डाउनलोड करू शकता. ई पॅन कार्ड डाउनलोड करण्याची पद्धत अगदी सोपी आहे. तुम्हाला पण डाऊनलोड करण्यासाठी आम्ही सोपा मार्ग सांगत आहे.

वेबसाईटवर जाऊन डाउनलोड करा.

जर तुम्ही तुमचा मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक केला असेल,तर पॅन कार्ड डाउनलोड करण्यासाठी आयकर ही फायलिंग वेबसाईट ही योग्य जागा आहे.

  1. सर्वप्रथम तुम्हाला अधिकृत आयकर ई-फायलिंग वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
  2. त्यानंतर डाव्या बाजूला दिसणाऱ्या instant e pen वर क्लिक करा.
  3. आता check status / download pan च्या खाली दिलेल्या continue वर क्लिक करा.
  4. आता तुम्हाला तुमचा बारा अंकी आधार क्रमांक टाकावा लागेल नंतर खाली दिलेल्या चेक बॉक्स वर मार्क करा आणि नंतर continue वर क्लिक करा.
  5. आता तुमच्या आधार कार्डशी लिंक केलेल्या मोबाईल नंबरवर एक OTP पाठवला जाईल.
  6. आता OTP टाका आणि Continue वर क्लिक करा.
  7. यानंतर दुसरी स्क्रीन दिसेल ज्यामध्ये View E-pan आणि Download E-pan हे पर्याय उपलब्ध असतील. यामधून Download E-pan चा पर्याय निवडावा.
  8. नंतर Save the PDF file वर क्लिक करा. या नंतर तुमचं e-Pan Card डाऊनलोड होईल.

तुम्हालाही पण डाऊनलोड करण्याचा पर्याय दिसत नसल्यास, तुम्हाला मागे जाऊन get new e pen चा पर्याय निवडावा लागेल. त्यानंतर दिलेली प्रोसेस कंटिन्यू करा. याशिवाय जर तुम्ही डाऊनलोड केलेली PDF फाईल पासवर्ड प्रोटेक्टेड असेल, तर त्याचा पासवर्ड म्हणून तुमची जन्मतारीख फॉर्मेट मध्ये टाकावी लागेल.

हे पण वाचा:-लग्नसराईच्या काळात आज सोन्याच्या भावात मोठा बदल

अशाच नवीन माहितीसाठी आमच्या ग्रुपला जॉईन करा

Krushna

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *