Thursday

13-03-2025 Vol 19

मायबाप सरकार, आम्ही जगावे की मरावे? दुष्काळ, अवकाळी ची मदत, पीकविम्याचा 25% अग्रीमही मिळेना; 54 लाख शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Drought Relief Announced: दुष्काळ, अवकाळी, शेतमालांचे गडगडलेले दर, कांदा निर्यात बंदी, अशा संकटांनी बळीराजा हतबलं झाला आहे. अशा चिंताजनक परिस्थितीत राज्यातील दुष्काळ जाहीर झालेल्या, 40 तालुक्यांमधील अंदाजे 42 लाख शेतकऱ्यांना काहीच मदत मिळालेली नसून, दुसरीकडे 5 लाख शेतकऱ्यांना पिक विम्याचा 25% अग्रीमही, तरी अवकाळी ने बाधित झालेल्या अंदाजे साडेसात लाख शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देखील मिळालेली नाही.

पावसाळ्यात सोलापूर जिल्ह्यासह राज्यातील 40 तालुक्यांमध्ये सरासरीच्या तुलनेत 50 टक्के सुद्धा पाऊस झाला नाही. केंद्र सरकारच्या निष्कर्षानुसार झालेल्या सॅटॅलाइट सर्वे नुसार सोलापूर जिल्ह्यातील सांगोला, माढा, माळशिरस, करमाळा व बार्शी या पाच तालुक्यांसह 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर झाला. केंद्रीय पथकाने पाहणी देखील केली. मात्र, एकाही शेतकऱ्याला दुष्काळी ची मदत मिळालेली नाही. तत्पूर्वी सोलापूर सह राज्यातील 19 जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊसाचा डाका बसला.. त्यात 5 लाख हेक्‍टरवरील पिकांचे मोठे नुकसान झालेले आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील ४९ हजार शेतकऱ्यांसाठी 59 कोटी 15 लाखांची मदत मिळावी, असा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाने राज्य सरकारला सादर केला. पण, अजूनही राज्यातील कोणालाच अवकाळीची भरपाई मिळालेली नाही. पिक विमा पोटी दुष्काळाने बाधित शेतकऱ्यांना 25% अग्रीम मिळावा अशी अधिसूचना जिल्हा अधिकाऱ्यांनी काढून 3 महिने झाले. तरीदेखील सोलापूर जिल्ह्यातील 68 हजार शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेतच असल्याचे, कृषी विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सकाळी बोलताना सांगितले.

…… तरी कांदा निर्यात बंदीचा निर्णय

पावसाळ्यात समाधानकारक पाऊस झाला नाही. धरणांचा मध्यम व लघु प्रकल्पाचा साठा तळाशी, जमिनीची पाणी पातळी एक मीटरने खालावली, शेतमालाला समाधानकारक दर नाही. उसाची एकर कमी एफआर पी मिळत नाही. गत वर्षीच्या तुलनेत 12 टक्क्यांनी शेतकरी आत्महत्या वाढल्याची स्थिती.

40 तालुक्यांचे 1 हजार 25 महसूल मंडळामध्ये दुष्काळ जाहीर करून 2 महिने झाले. तरीसुद्धा 40 तालुक्यामधील बाधित शेतकऱ्यांना दमडीची ही मदतं मिळालेली नाही. उर्वरित महसूल मंडळामधील शेतकऱ्यांच्या मुलांची ‘फी’ माफ झाली नाही.

अवकाळी चा सोलापूरचा राज्यातील 5 लाख हेक्टरला तडाका बसला, तातडीने पंचनामे करून बाधित शेतकऱ्यांच्या मदतीचे प्रस्ताव शासनाकडे पाठवले. मात्र, एकालाही मदत मिळालेली नाही.

पावसाळ्यात 21 दिवसांचा खंड पडल्याने, सोलापूर सहवीस जिल्हाधिकाऱ्यांनी अधिसूचना काढून, शेतकऱ्यांना पिक विमा पोटी 25% अग्रीम देण्याचे आदेश दिले. तरी सुद्धा सोलापूर जिल्ह्यातील 68 हजार शेतकऱ्यांना 30.50 कोटी मिळालेच नाही.

दुष्काळ परिस्थितीमध्ये सध्या मागील शेती कर्जाची वसुली थांबविली आहे. या पार्श्वभूमीवर बँकांनी रब्बीच्या कर्ज वाटपात हात आखडता घेतल्याची सोलापूर सह राज्यभरात स्थिती आहे.

सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची स्थिती

दुष्काळी मदत तिची प्रतीक्षा
41.73 लाख शेतकरी

अवकाळी ने बाधित शेतकरी
7.49 लाख

पिक विम्याचा अग्रिम न मिळालेले
4.83 लाख

मदतीच्या प्रतीक्षेतील एकूण शेतकरी
54.05 लाख

Rushikesh

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *