Drought News: ई-पिक पाहणी नोंद केलेल्या सर्व शेतकऱ्यांना मिळणार दुष्काळी सवलती, पहा सविस्तर माहिती


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Drought News: नमस्कार शेतकरी मित्रांनो, खरीप हंगामा संपून चार महिने झाल्यानंतर शासनाने दुष्काळी तालुक्यातील खरीपांच्या 18 हजार हेक्टर क्षेत्रावरील पीकपाणी, शेतकरी गट आणि सर्वे नंबरच्या याद्या सादर करण्याचा अध्यादेश महसूल आणि कृषी विभागाला दिला आहे.

दुष्काळ सर्व सवलती ई-पीक पाहणी नोंदी केलेल्या शेतकऱ्यांनाच मिळतील अशी अट या अध्यादेशामध्ये घेतलेने तलाठी व कृषी सहाय्यकाची कोंडी झाली आहे. तालुक्यातील 62 गावांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने 18 ते 20 हजार हेक्टर वरील खरिपाच्या भुईमूग, सोयाबीन, भात, ज्वारी इतर कडधान्य पेरण्या वाया गेल्या होत्या.

शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानामुळे शासनाने तालुका दुष्काळी जाहीर केले आहे. खरीप हंगाम संपून चार महिने झाले आहे. सेक्सवर मोकळे पडलेले असताना शासनाने तब्बल चार महिन्यानंतर पीक पाणी शेतकरी याद्या तयार करून शासनाकडे पाठवण्याचा अध्यादेश महसूल आणि कृषी प्रशासनाला दिला आहे.

शासनाच्या निकषानुसार दुष्काळ जाहीर झालेल्या तालुक्यातील शेतकऱ्यांना जरायक क्षेत्रासाठी हेक्टरी आठ हजार पाचशे रुपये मदत मदत देण्यात येणार आहे. तालुक्यातील 18 हजार हेक्टर क्षेत्राला किमान 15 ते 16 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या स्टेट बँक खात्यात जमा करण्याची शक्यता आहे. Drought News

शासनाचे आध्यादेशांमध्ये दुष्काळी तालुक्यातील खरिपाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांन निश्चित स्वरूपात मदत देण्याचा निर्णय झाल्यास शेतकऱ्यांना खते, बियाणे, औषधे व इतर मदत थेट शेतकऱ्यांना मिळेल असा आहे.

तालुक्यातील 100 टक्के सरसकट शेतकऱ्यांच्या गट आणि सर्वे नंबर नुसार याद्या तयार करण्याच्या सूचना कृषी सहाय्यकांना देण्यात आले आहेत. 30 ते 32 गावाच्या याद्या तयार आहेत चार दिवसात संपूर्ण लाभार्थी शेतकऱ्यांच्या याद्या शासनाकडे पाठवण्यात येणार आहेत. तसेच ते 30 टक्के वीज सवलत, कर्ज पुनर्गठण, व्याज सवलत, शाळा शुल्क या सुविधांचा लाभ मिळणार आहे असे कृषी अधिकारी यांनी सांगितले.

हे पण वाचा:- शेतकऱ्यांना मोठा दिलासा कापुस बाजार भावात तेजी..! आज कापसाचे दर 400 रुपयांनी वाढले

अश्याच नवनविन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

1 thought on “Drought News: ई-पिक पाहणी नोंद केलेल्या सर्व शेतकऱ्यांना मिळणार दुष्काळी सवलती, पहा सविस्तर माहिती”

Leave a Comment

error: Content is protected !!