Drought Declared | दुष्काळग्रस्त चाळीस तालुक्यामध्ये शेतकऱ्यांना मदत जाहीर, यांना मिळणार हेक्टरी 22,500 रुपये


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Drought Declared : राज्यामध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे. पावसाळ्यामध्ये सरासरीपेक्षा 50 ते 75 टक्के पेक्षा कमी पाऊस झाला असून शेतकऱ्यांचे खरीप हंगाम वाया गेलेले आहे. मंत्रिमंडळाच्या उप समितीने 1021 महसूल मंडळातील दुष्काळ जाहीर केलेला आहे मात्र वाढीव मंडळातील शेतकऱ्यांना केवळ सवलती मिळणार असून आर्थिक मदत परवडणारी नसल्याने 40 तालुक्यातील शेतकऱ्यांनाच अर्थसहाय्य मिळेल असे मदत व पुनर्वसन विभागातील विश्वासनीय सूत्रांनी सांगितले.

राज्यातील दहा जिल्ह्यातील 355 गावे आणि 959 वाड्या रस्त्यांवर पाणीपुरवठा करण्यासाठी 377 टँकर सुरू झालेले आहेत धरणे व मध्यम लघु प्रकल्प साठ्यातील पाणी साठी देखील झपाट्याने कमी होत आहे आणि अनेक जिल्ह्यांमध्ये जनावरांचा चांगला प्रश्न जाणू लागलेला आहे पावसाअभावी खरीप वाया गेला परतीचा पाऊस न झाल्याने जमिनीतील नसल्याने रब्बीच्या पेरणी कमी झाल्याची वस्तूस्थिती आहे. सॅटॅलाइट सर्वे राज्यातील काही तालुक्यांमध्ये दुष्काळ स्थिती असल्याचे नमूद झाली आहे. परंतु राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेते एक हजार एकवीस महसूल मंडळामध्ये दुष्काळ जाहीर केला आहे.

मात्र, चाळीस तालुक्यांनाच दुष्काळ सवलती आर्थिक मदत मिळणार आहे संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कडून विभागीय आयुक्त यांना प्रस्ताव येथील. त्यानंतर तिथून संबंधित 40 तालुक्यामधील शेतकऱ्यांना मदतीची प्रस्ताव मदत व पुनर्वसन विभागाला प्राप्त झाल्यानंतर मंत्रिमंडळ बैठक मदत वितरित करण्याचा निर्णय अपेक्षित आहे. मंत्रिमंडळाने निर्णय घेतल्यास वाढलेल्या महसूल मंडळातील शेतकऱ्यांनाही आर्थिक मदत मिळू शकते असेही सूत्रांनी सांगितले.

दुष्काळग्रस्तांना ‘या’ आठ सवलती

  • शेतकऱ्यांना जमीन महसुलात सूट
  • शेतकऱ्यांकडे पीक कर्जाचे पुनर्गठण
  • शेतीशी निगडित कर्ज वसुलीला स्थगिती
  • कृषीपंपाचे चालू विजबिलआत ३३.५ टक्के सूट
  • शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी
  • रोजगार हमी योजना अंतर्गत कामाच्या निकषात शिथिलता
  • आवश्यक त्या गावांना पिण्याचे पाणी टँकरने पुरवणे
  • महावितरण ने शेती पंपाचे वीज जोडणी खंडित करू नये

दुष्काळग्रस्त हेक्टरी मदत

  • जिरायत
  • ८,५००
  • बागायती
  • १७,०००
  • बहुवार्षिक
  • 22,500

1 thought on “Drought Declared | दुष्काळग्रस्त चाळीस तालुक्यामध्ये शेतकऱ्यांना मदत जाहीर, यांना मिळणार हेक्टरी 22,500 रुपये”

Leave a Comment

error: Content is protected !!