Drought: नमस्कार मित्रांनो, गेल्या वर्षी राज्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे यंदा राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पाण्याची टंचाई भासत आहे. महाराष्ट्र राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याचा देखील प्रश्न निर्माण झाला आहे. शेतीला पाणी कमी पडल्यामुळे उभे पीक करपले असून जनावराच्या चाऱ्यासाठी पाण्याचा प्रश्न मोठा गंभीर बनला आहे. दुष्काळाच्या संकटामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. सर्वसामान्यांना पाण्याचा प्रश्न सतावत आहे.
दरम्यान मार्च महिन्याच्या शेवटच्या दिवशी रविवारी राज्यात सर्व धरणातील पाणीसाठ्यामध्ये मागील तीन दिवसात 1.85% ची गट झाली आहे. तर सध्याच्या स्थितीत राज्यातील सर्व धरणांमध्ये 37.91 टक्के पाणी शिल्लक आहे. हाच साठा गेल्यावर्षी या दिवसात 46.83% होता. मागील तीन दिवसांपूर्वी 39.76% साठा होता.
राज्यात धरणे किती? | Drought
राज्यात सुमारे 2994 धरणे आहेत. सर्व लहान-मोठी अशी धरणे मिळून राज्यात सुमारे 2994 धरणे आहेत यात मोठे धरणे 138 आहेत. मध्यम प्रकारचे 260 आहेत आणि लहान आकाराचे 2596 धरणे आहेत. या सर्व धरणांमध्ये मार्च महिन्याच्या शेवटच्या दिवशी 37.91% पाणीसाठा शिल्लक होता. जो तीन दिवसात सुमारे दोन टक्क्यांनी घटला आहे. तर गेल्या वर्षी याच दिवसात या 2994 धरणात 46.83% पाणीसाठा होता. यामुळे यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.92% पाण्याची कमतरता आहे.
राज्यातील धरणाचे विभाग आणि पाणीसाठा
राज्यातील नागपुरी विभागात 16 लहान मोठे धरण आहेत. या ठिकाणी 48.81% पाणीसाठा आहे. तर गेल्यावर्षी या दिवसात या ठिकाणी धरणामध्ये 20.44% पाणीसाठा होता. अमरावती विभागात देखील दहा धरणाची स्थिती चांगली नसून येथे 45.44% पाणीसाठा आहे तर औरंगाबाद विभागात 44 धरणांमध्ये सध्या 21.52% पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी तो 43.03% होता. यामुळे येथे सध्या दुष्काळाची स्थिती निर्माण झाली आहे. नाशिक विभागात गेल्यावर्षी 56.63% पाणीसाठा होता मात्र यंदा चांगलीच घड झाली असून सध्या तिथे 39.63 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.
1 एप्रिल पासून मोठे बदल; या लोकांनाच मोफत रेशन मिळणा..! रेशनकार्डांची नवीन यादी जाहीर, यादीत तुमचे नाव पहा
पुणे व कोकण विभाग | Drought
पुणे विभागात देखील गंभीर परिस्थिती असून येथे देखील पाणीसाठ्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे 12% ची घट झाली आहे. गेल्या वर्षी याच दिवसात पुणे विभागात धरणामध्ये 47.52% पाणीसाठा शिल्लक होता तो यंदा 36.39% वर आला आहे. तर कोकण विभागात अकरा धरण असून येथे 44.75 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे जो गेल्यावर्षीच्या तुलनेत फक्त 2.65 टक्क्यांनी कमी झाला आहे. तर राज्यातील मोठ्या धरणात पाहिलं तर 138 धरणामध्ये 37.55 टक्के पाणीसाठा शिल्लक असून गेल्यावर्षी तो 44.54% एवढा होता.
मराठवाड्यात काय परिस्थिती आहे?
गेल्या वर्षी पाऊस सरासरीपेक्षा कमी झाल्याने धर्मातील पाण्याच्या साठ्यात मनावर तशी वाढ झाली नाही. उलट तापमान वाढल्यामुळे धरणातील पाणीसाठ्याने तळ गाठला आहे. त्यामुळे राज्यातील अनेक गावांना टँकरची गरज भासत आहे. तर राज्यातील हजार गावांना 940 टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. बीड जिल्ह्याकडे पाहिलं तर 150 टँकरची मागणी केली होती तर मराठवाड्यात पाणी टंचाईच्या झळा खूप मोठ्या प्रमाणात असून येथे आठ पैकी पाच जिल्ह्यांमध्ये 647 गावात 763 टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.
भूजल संरक्षण व विकास यंत्रणेने केलेल्या सर्वेनुसार राज्यात 353 पैकी 32 तालुक्यामधील भूजल पातळी खाली गेल्याचे दिसून आले आहे. तर फक्त दोन ठिकाणी भूजल पातळी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे.
या अहवालानुसार जिल्हा नुसार भूजल पातळी पुढील प्रमाणे आहे
- पुणे जिल्हा – भोर तालुका १.१६, मुळशी तालुका 1.75, वेल्हे तालुका १.२८
- सातारा जिल्हा – जवळी तालुका 2.23, आणि खंडाळा तालुका 1.98
- अहमदनगर जिल्हा – अकोला तालुका 2.75, आणि जामखेड तालुका 1.82
- बीड जिल्हा (मराठवाडा) – परळी तालुका 1.91
- बुलढाणा जिल्हा (विदर्भ) – चिखली तालुका 1.09 आणि लोणार तालुका 2.51