Dairy Farming | नमस्कार शेतकरी मित्रांनो, आता महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक शेतकरी हे शेतीसाठी जोडधंदा म्हणून एक दूध व्यवसाय हा सुरू करत असतात. अशातच, आता महाराष्ट्र राज्य सरकारने यामध्ये दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी नवीन एक जीआर काढलेला आहे. तर काय आहे तो जीआर ? व त्याबाबत काय माहिती दिलेली आहे, ती आपण सविस्तर यामध्ये पहावी. Dairy Farming
या महाराष्ट्र राज्यामध्ये दूध उत्पादक शेतकऱ्यांना आता प्रतिलिटर 5 रुपये अनुदान योजनेला चांगल्याच प्रकारचा प्रतिसाद मिळाल्यानंतर महाराष्ट्र सरकारने या खरेदी भावाचा निर्णय हा बदललेला आहे. आणि त्यानुसार आता 27 रुपये प्रति लिटर खरेदी व भाव 25 रुपयांवर आणण्यात आलेला आहे.
पण मात्र, या अशा निर्णयामुळे शेतकऱ्यांना दोन रुपयाचा तोटा हा होईल, पण ही बाब घातक असल्याची माहिती शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे. अशा निर्णयामुळे ज्या सहकारी व खाजगी दूध संस्था उपलब्ध आहेत, अशांनी 25 रुपये लिटर भावाने दूध खरेदी करत असतील. व शेतकऱ्यांना पाच रुपये प्रति लिटर अनुदानाचा हा लाभ अशा शेतकऱ्यांना भेटणार आहे.
महाराष्ट्र राज्यामध्ये आतापर्यंत केवळ 51 हजार 500 शेतकऱ्यांना 5 कोटी 44 लाखांचे अनुदान हे वाटण्यात आले आहेत. व या निर्णयामुळे आता जास्तीत जास्त शेतकऱ्यांना याचा लाभ होईल व महाराष्ट्र सरकारचा हा अंदाज आहे.
महाराष्ट्र सरकारने या जानेवारी महिन्यातील महाराष्ट्र राज्यातील सहकार्य व खाजगी दूध संघ आणि तसेच या प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना 5 रुपये प्रति लिटर दूध अनुदान देण्याचा हा निर्णय घेतलेला होता. यासाठी आता दूध संघ व प्रकल्पामार्फत या दूध उत्पादक शेतकऱ्यांना 3.5 फॅट व 8.5 एस एन एफ या प्रतीसाठी किमान 27 रुपये या प्रतिलिटर प्रमाणे भाव हा देण्यात येणे अपेक्षित आहे.
या शेतकऱ्यांना महाराष्ट्र सरकारकडुन 5 रुपये प्रतिलिटर अनुदान जाहीर करण्यात आले होते. पण मात्र, यामध्ये अनेक दुध संघ तसेच प्रकल्प 27 रुपये प्रतिलिटर दराने दुध खरेदी करत नव्हते. बाजारातील दराच्या चढ-उतारामुळे या संघ व प्रकल्पांना दुध खरेदी ही तोट्याची होत होती.
परिणामी 27 रुपयांपेक्षा कमी भावाने ही दुध खरेदी होत असल्यामुळे अनुदानाचा लाभ हा देता येत नव्हता. महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव नितीन करीर यांनी दुध संघ व प्रकल्पांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली आहे.
ही आनुदानाची योजना जाहीर झाल्यापासून आजवर महाराष्ट्र राज्यामध्ये 51 हजार 600 शेतकऱ्यांना 5 कोटी 44 लाख रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आले होते. या आकड्यांवरुन ही योजना शेतकऱ्यांना लाभदायक ठरत नसल्याचे स्पष्ट झालेले होते. आणि तयानंतर महाराष्ट्र राज्यसरकारने यांची कक्षा वाढविण्यासाठी दुध खरेदीचे भाव कमी करण्याचे ठरविले आहे.
या निर्णयामुळे शेतकऱ्यांना 2 रुपयाचा तोटा हा होईल. महाराष्ट्र सरकारने या दुधाला किमान भाव हा 34 रुपये प्रति लिटर देण्याचे सांगितले होते. व त्यानंतर या अनुदानाच्या माध्यमाधुन हा भाव 30 रुपयांवर आणण्यात आला आहे.