Dairy farmers | देशातील दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक चांगलीच आनंदाची बातमी आलेली आहे. आता दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधाला 5 रुपये अनुदान दिल्याने शेतकरी अगदी खुश झालेले दिसत आहेत.
पण आता या मार्च महिन्यामध्ये देशातील सर्व (Dairy farmers) दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधाचे अनुदान हे मार्च अखेरपर्यंत जमा होणार आहेत. अशी माहिती दुग्ध विकास मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे.तर या अनुदानाबद्दल सविस्तर माहिती जाणून घेवुया.
हे पण वाचा | शेती विषयक माहिती व हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
दुधाचे बाजार हे कमी झाल्यानंतर दूध उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक हातभार लागावा म्हणून दुधाला प्रति लिटर पाच रुपये अनुदान हे देण्यात आलेले होते. 11 जानेवारीपासून ही सुरुवात केलेली आहे. 10 फेब्रुवारी पर्यंत होती पण, त्यानंतर त्यामध्ये मुदत वाढ करून ती आता 10 मार्चपर्यंत करण्यात आली होती. याच दरम्यान या योजनेचे अनुदान हे अजून प्राप्त झालेले नव्हते, यासाठी या दूध उत्पादकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
अशाच नवनवीन माहितीसाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
मार्चअखेर या दूध उत्पादकांच्या खात्यामध्ये हे अनुदान जमा होत आहे. यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी चांगलीच आनंदाची बातमी आहे. आणि तसेच दूध उत्पादक शेतकरी हे दुधाचे उत्पन्न जास्तीत जास्त काढीत राहावे. यासाठी त्यांना चांगलाच प्रतिसाद हा मिळेल. अशी माहिती दुग्ध विकास मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे.