Daily Astrology Today : आज 15 जानेवारी सोमवारी मकर संक्रांतीचा दिवस या दोन राशीसाठी खास असणार आहे. चला तर जाणून घेऊया मकर संक्रांतीचा कसा जाईल.
आज 15 जानेवारी, वार सोमवार मकर संक्रांतीच्या दिवशी रवी मकर राशि प्रवेश करतोय. पुणे काल सूर्योदय ते सूर्यास्त पर्यंत राहणार आहे. चंद्र गुरुच्या राशीतून आणि स्वनक्षत्रातून भ्रमण करीत राहू-नेपच्यून बरोबर योग शोधणार आहे. पंचांग शुद्धी असणारा आजचा आनंदी दिवस कसा असेल ते जाणून घेणार आहोत.
मेष राशी Aries
- आज चंद्रशी होणार योग पाहता थोडेसे संयमितपणाबरोबरच धोरनी राहील. ज्यांनी काही करण्याचे स्वप्न रंगवले असतील. त्यांची पूर्णत्वाकडे वाटचाल सुरू होणार आहे. काळजी करण्यापेक्षा काळजी घेण्याची सवय अंगी बाळगण्याची गरज आहे. तुमच्या हुशार आणि उद्योग प्रियतेमुळे यशाला खेचून आणाल. प्रतिकूल परिणाम येण्याची शक्यता असणार आहे. व्यवसायामध्ये मोठे निर्णय घेण्याचे धाडस करू नका. आर्थिक व्यवहार फार काळजीपूर्वकपणे करा.
वृषभ राशी Taurus
- या राशीतील लोकांसाठी आजचा दिवस खूपच खास असणार आहे. नोकरीत आणि व्यवसायात मनासारखे कार्यामुळे तब्येत खूप चांगली राहणार आहे. सगळीकडे धडाधडी दाखवा लहान लोकांना मला प्रमाणे वागून घ्याल. प्रवासात जाण्याचा योग येऊ शकतो. ज्यांचे प्रदेशात व्यवहार आहे त्यांना तिथून चांगले संकेत मिळणार आहेत छोटी ट्रीप करावी वाटेल. प्रकृतीचा कोणताही त्रास अंगावर काढू नये. प्रगतीचे सगळे मार्ग मोकळे होतील. नवीन ग्रहपयोगी वस्तू खरेदी कराल. व्यवहारामध्ये काही नवीन योजना पूर्ण होणार आहेत. तसेच मित्रमंडळीचे सहकार्य लाभनार आहे.
(Disclaimer : ही माहिती फक्त वाचकांसाठी बनवले गेलेले आहे. यामध्ये आम्ही कुठल्याही प्रकारचा दुजोरा देत नाही. कुठल्याही प्रकारचा प्रयोग करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा)