DA new update : मोदी सरकारने महागाई भत्ता मध्ये चार टक्के वाढ केलेली आहे. सरकारी कर्मचारी आणि पेन्शन धारकांसाठी ही आनंदाची बातमी आहे. सर्वात महत्त्वाची म्हणजे ही बातमी मोदी सरकारने दिवाळीपूर्वी दिलेली आहे तर नागरिकांसाठीही बातमी आनंदाची आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शन धारकांच्या महागाई भत्ता मध्ये वाढ करण्यास मंजुरी देण्यात आलेली असून मागे भात त्यामध्ये चार टक्के वाढ करून ती 42 टक्के ते ४६ टक्के एवढी करण्यात आली आहे.
महागाई भत्ता वाढवण्यास मंजुरी दिली
18 ऑक्टोबर २०२३ बुधवार रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये महागाई भत्ता वाढ करण्यास मंजूर देण्यात आलेली असून केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शन धारकांना ऑक्टोबर महिन्याच्या पगार महागाई भत्ता मध्ये वाढीस मिळण्याची शक्यता आहे केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शन धारकांना जुलै ते सप्टेंबर ची थकबाकी ऑक्टोबर महिन्याच्या पगारासह दिली जाऊ शकते.
दिवाळीपूर्वी मोदी सरकार देणार गिफ्ट
15 ऑक्टोबर रोजी नवरात्र उत्सवाला सुरू झाली असून 24 रोजी ऑक्टोबरला दसरा आहे. 12 नोव्हेंबर 2023 रोजी दिवाळी आहे अशा परिस्थितीत सणासुदीच्या दिवशी मोदी सरकारने केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शन धारकांच्या महागाई भत्त्यामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतलेला आहे केंद्रीय सरकारच्या या निर्णयाचा फायदा 47 लाख कर्मचारी आणि 68 लाख पेन्शन धारकांना होणार आहे.