DA Hike | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ज्याची चर्चा सुरू होती तोच निर्णय अखेर केंद्र सरकारने मार्गी लावला आहे. महागाई भत्ता तीन टक्के वाढवण्यात आला आहे. सातवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर प्रत्येक वेळी महागाई भत्ता किती वाढणार याकडे लाखो सरकारी कर्मचाऱ्यांनी निवृत्त पेन्शनधारक डोळे लावून बसले असतात. पण यावेळी देखील अशीच उत्सुकता होती आणि आज राज्य सरकारकडून अधिकृत GR जाहीर करण्यात आला असून, हा कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा देण्यात आलेला आहे. DA Hike
देशभरात तब्बल 48 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 68 लाख पेन्शनधारकांना या निर्णयाचा थेट फायदा होणार आहे. याआधी मार्च महिन्यात महागाई भत्ता दोन टक्क्यांनी वाढवला गेला होता. पण एआयसीपीआयच्या आकडेवारीनुसार महागाईचा दर पाहता यावेळी तीन टक्क्यांनी वाढ निश्चित असल्याचं बोललं जात होतं. मात्र अंतिम निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाचाच असणार होता. आज मंत्रिमंडळाने मंजुरी देऊन तो निर्णय स्पष्ट केला आणि कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला.
यामुळे आता केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 55 टक्क्यांवरून 58 टक्क्यांवर गेला आहे. ही वाढ 1 जुलै 2025 पासून लागू करण्यात आली असून, याचा लाभ मात्र ऑक्टोबर महिन्याच्या पगारासोबत मिळणार आहे. म्हणजेच कर्मचाऱ्यांना ऑक्टोबरमध्ये केवळ वाढीव भत्ता नाही, तर मागील तीन महिन्यांचा फरक (जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर) देखील एकरकमी मिळणार आहे. त्यामुळे दसरा दिवाळीच्या आधीच कर्मचाऱ्यांच्या हातात जास्तीचा पैसा पडणार आहे आणि या सणाची धूम अधिकच वाढणार आहे.
सरकारने दिलेल्या आकडेवारीनुसार, तीस हजार बेसिक पगार असणाऱ्या कर्मचाऱ्यांना हा महागाई भत्ता वाढीमुळे धर्म सुमारे 900 रुपयांचा फायदा होणार आहे. म्हणजे वार्षिक आधारावर 10,800 रुपयांच्या तरी कमी होणार आहे. मोठ्या पगारांच्या कर्मचाऱ्यांना यापेक्षा जास्त लाभ मिळणार आहे. हा पैसा हाताशी येणे म्हणजे अनेक कुटुंबांना आर्थिक दिलासा मिळणं होय. त्यामुळे हा निर्णय फक्त आकडेवारी पुरता मर्यादित नाही, तर लागू सरकारी कर्मचारी आणि निवृत्त पेन्शनधारकांना सणासुदीच्या काळात एक दिलासा देणारा ठरला आहे. मोदी सरकारने दिवाळीपूर्वी कर्मचाऱ्यांना ही एक मोठी भेट दिलेली आहे त्यामुळे हा विषय सर्वत्र चर्चेचा ठरला आहे.
(Disclaimer | वरील दिलेली माहिती ही प्रसारमाध्यमांच्या आधारे आहे याबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाही.)
हे पण वाचा | मोदी सरकारचा सर्वात मोठा निर्णय, महागाई भत्त्यात केली 4 टक्क्यांनी वाढ