Cyclone In India: नमस्कार मित्रांनो, देशावर आणखीन एक संकट आले आहे. पश्चिम किनारपट्टी भागात आज तीव्र चक्रीवादळ धडकणार असल्याचे इशारा हवामान विभागाने दिला आहे. सध्या देशातील वेगवेगळ्या भागात वेगवेगळे वातावरण पाहायला मिळत आहे. हवामान बदलाचा परिणाम देशाच्या प्रत्येक भागात दिसून येत आहे. मात्र आता देशावर आणखीन एक मोठे संकट आले आहे.
IMD चा दररोज हवामान अंदाज पाहण्यासाठी येथे क्लिक करा
पश्चिम किनारपट्टी भागात आज तीव्र चक्रीवादळ धडकणार असल्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. रेमल चक्रीवादळ आज संध्याकाळी सहाच्या सुमारास पश्चिम बंगालच्या सागरभेट आणि बांगलादेशच्या खूपेपुरा किनारपट्टीवर धडकणार असल्याचा इशारा आयएमडीने सांगितला आहे. Cyclone In India
चक्रीवादळामुळे 26 व 27 मे रोजी दक्षिण व उत्तर 24 परगना, पूर्व मेदिनीपूर, कोलकत्ता हावडा व पश्चिम बंगालच्या हुगळी या जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आयएमडी ने वर्तवली आहे. याचा परिणाम 26 व 27 मे रोजी उत्तर ओडिसा वर देखील होऊ शकतो. तसेच ईशान्य भारताच्या काही भागांमध्ये अतिवृष्टी होऊ शकते. पश्चिम बंगालमधील पश्चिम मेदिनिपुर, पूर्व वर्धमान व नदिया या जिल्ह्यांमध्ये 26 व 27 मे रोजी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
पोस्ट ऑफिसच्या या योजनेत फक्त एवढे पैसे जमा करा आणि दरमहा मिळवा 20 हजार रुपये
रेमल चक्रीवादळ किती तीव्र आहे? चक्रीवादळ म्हणजे काय? त्याचे प्रकार किती? याविषयी सर्व सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत. आय एम डी ने सांगितल्याप्रमाणे या चक्रीवादळाचा हवामानात किंवा मान्सून पावसावर काय परिणाम होणार आहे? याबद्दल आपण सर्व माहिती जाणून घेणार आहोत.
‘रेमल’ चक्रीवादळ म्हणजे काय?
रेमल चक्रीवादळ वाऱ्याचा वेग 110 ते 120 किलोमीटर प्रति तास आहे. हे वादळ 135 किलोमीटर प्रति तास वेगाने वारे निर्माण करते. हे एक उष्णकटिबंधीय चक्रीवादळ आहे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्रधिकरण चक्रीवादळाची विस्तूरपणे दोन श्रेणीमध्ये वर्गीकरण करते. पहिल्या आहे समशी तोष्ण चक्रीवादळ आणि दुसरे आहे उष्णकटिबंधीत चक्रीवादळ.
पीएम किसान योजनेची केवायसी अपडेट केली तरच तुम्हाला ₹2000 मिळतील, घरी बसून E-KYC करा
चक्रीवादळ म्हणजे काय?
चक्रीवादळ हवेची एक मोठी प्रणाली आहे चक्रीवादळ हे कमी दाबाचे केंद्र असते. ही वादळे अनेक दिवस आणि शेकडो किलोमीटरचा प्रवास करू शकतात. एन डी एम नुसार उत्तर गोलार्धात घड्याळाच्या उलट्या दिशेने आणि दक्षिण गोलार्धात घडल्याच्या सरळ दिशेने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे हवेमध्ये भवरा तयार होत आहे. चक्रीवादळाचा आकार गोल किंवा लंबवर्तुळाकार असतो.
समशीतोष्ण चक्रीवादळ काय आहे?
सबसे तोष्णा चक्रीवादळास मध्ये अंशास किंवा बोरो क्लीनिक चक्रीवादळ म्हणूनही ओळखले जाते. अति उष्ण कटिबंधीत चक्र वादळे उष्णकटिबंधाच्या बाहेर उद्भवतात. युएस नॅशनल असोसिएशन अँड ऍटमॉसपेरिक ऍडमिनिस्टेशन (NOAA) नुसार या वादळाच्या आतल्या बाजूस थंड हवा असते. Cyclone In India
1 जूनपासून गॅस सिलिंडरवर लागू होणार नवीन नियम, सर्वांसाठी हे जाणून घेणे खूप महत्त्वाचे..
उष्णकटिबंधीत चक्रीवादळ म्हणजे काय?
बंगालच्या उपसागरात उष्णकटिबंधीय चक्रीवादळे जास्त प्रमाणात तयार होतात. ही वादळे पृथ्वीवरील सर्वात विनाश कारक वादळे आहे. आशा चक्रीवादळाचा आकार वाढत जातो. ज्यामुळे गडगडाटी वादळे जोरदार वारे व मुसळधार पाऊस पडू शकतो. त्यांना उत्तर अटलांटिक आणि पूर्वोत्तर स्पेसिफिक महासागरात हिरकेन म्हटले जाते. विश्ववृत्ताच्या दोन्ही बाजूंना असणाऱ्या भागाला उष्णकटिबंधीत प्रदेश म्हणतात. या प्रदेशात सूर्याची किरणे थेट समुद्रात पडतात. ज्यामुळे पाणी तापते आणि पाण्याची वाफ मोठ्या प्रमाणात होते.
तयार झालेली ही वाफ वर वर जाते तसा समुद्राजवळ दाब कमी होतो. कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यावर पोकळी भरण्यासाठी आजूबाजूची हवा एका ठिकाणी येते व वाऱ्याचा वेग वाढत जातो आणि चक्रवाढ तयार होते. उष्णकटिबंधीत चक्रीवादळांना त्यांच्या स्थान आणि शक्तीनुसार वेगवेगळी नावे दिली जातात.
1 thought on “‘रेमल’ चक्रीवादळ आज किनाऱ्यावर पोहोचले; चक्रीवादळ म्हणजे काय? ही वादळ कसे तयार होतात? पहा IMD चा हवामान अंदाज”