Crop Insurance News | शेतकऱ्यांसाठी महत्वाची व आनंदची बातमी समोर येत आहे. खरीप हंगामामध्ये अपेक्षित असा पाऊस न झाल्यामुळे सर्वत्र दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली आहे. व शीत पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याच बाबत शेतकऱ्यांना पिक विमा अनुदान वाटप करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी यादी सूचना काढून पिक विमा वाटप करण्याचे निर्देश विमा कंपनीला दिलेले आहे. Crop Insurance News
काही ठिकाणी विमा कंपनीने पीक विम्याची वाटप केलेले आहे तर काही ठिकाणी वाटप करणे अजून बाकीच आहे. देशभरामध्ये लोकसभेची सार्वत्रिक निवडणुका असल्यामुळे पिक विमा आत्तापर्यंत प्रलंबित होता. परंतु 4 जून नंतर आचारसंहिता शिथिलता होणार आहे यानंतर पीक विम्याचे वाटप होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.
या तारखेला मिळणार शेतकऱ्यांना पिक विमा
शेतकऱ्यांसाठी सध्याचा काळ हा मोठा आणीबाणीचा काय निर्माण झालेला आहे. कारण अपेक्षित असा पाऊस न झाल्यामुळे राज्यातील अनेक भागांमध्ये दुष्काळ परिस्थिती निर्माण झालेली आहे.
लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक लागली आहे. शासनाच्या माध्यमातून कोणतेही मोठे पाऊल उचलण्यात आलेले नाही. परंतु चार जून नंतर आचारसंहिता संपणार आहे. आचारसंहिता संपल्यानंतर पाच जून ते 20 जून दरम्यान शेतकऱ्यांच्या खात्यावरती पिक विमा जमा करण्यात येऊ शकतो. पाच जून पासून पिक विमा वाटपाचे काम सुरू होणार असल्याची माहिती देखील समोर येत आहे.
या शेतकऱ्यांना मिळणार नाही पिक विमा
शेतकऱ्यांनी ही बाब देखील लक्षात ठेवणे गरजेचे आहे. ज्या महसूल मंडळामध्ये अधिसूचना जाहीर केली जाते. त्यात मंडळातील कंपनीच्या अंतिम अहवालानुसार पिक विमाचे वितरण केले जाते. पिक विमा सामान्यता पात्र झालेल्या महसूल मंडळाला दिला जातो. 25% आगाव प्राप्त झाल्यास 75 टक्के अंतिम अहवालनुसार दिले जाते. लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा केली जाऊ शकते. ज्या महसूल मंडळामध्ये पिक विमा जाहीर केला आहे. त्याच शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे.
Bionka Coslet