Crop Insurance: नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. उर्वरित 75 टक्के पिक विमा वाटपाची सुरुवात झाली आहे. खरीप हंगाम 2023 मध्ये झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून विम्याचे वितरण केले जाते. 2023 मधल्या पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. त्या नुकसान भरपाई म्हणून पीक विम्याची 25% अग्रीम रक्कम शेतकऱ्यांना देण्यात आली होती. मात्र उर्वरित 75 टक्के पिक विमा शेतकऱ्यांना देणे बाकी होते.
उर्वरित 75 टक्के पिक विम्या साठी पात्र शेतकऱ्यांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
पावसाचा अनियमित खंड आणि नैसर्गिक आपत्तीमुळे राज्यातील शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्या नुकसानीची भरपाई करण्यासाठी पिक विमा योजनेचा मार्ग शेतकऱ्यांनी निवडला होता. आता शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळू लागला आहे. राज्यातील जवळपास सर्व शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरले आहेत.
सर्वाधिक नुकसानग्रस्त जिल्ह्यांना प्राधान्य
राज्यातील सर्वाधिक नुकसान झालेल्या जिल्ह्यांपैकी सोलापूर जिल्ह्याला पिक विमा वाटपात प्राधान्य देण्यात आले आहे. सोलापूर जिल्ह्यातील पिक विम्याचे वितरण यापूर्वीच सुरू झाले असून मंगळवेढा तसेच इतर तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांना अद्याप पिक विमा मिळालेला नाही अशा सर्व शेतकऱ्यांना लवकरात लवकर पिक विम्याची रक्कम मिळणार आहे. Crop Insurance
रेशन कार्डची नवीन यादी आली आहे, आता फक्त यांनाच मिळणार मोफत रेशन, इथून पटकन तुमचे नाव तपासा
पिक विमा वाटण्याची प्रक्रिया कधी चालू होणार?
पिक विमा वाटण्याची प्रक्रिया दोन टप्प्यात राबवली जाते प्रथम पंचवीस टक्के अग्रीम रक्कम दिले जाते आणि नंतर उर्वरित 75 टक्के रक्कम वितरित केली जाते. ज्या भागात 21 दिवसापेक्षा जास्त काळ पावसाचा खंड पडला असेल आणि अंतिम पैसेवारी 50 टक्के पेक्षा कमी असेल. अशा ठिकाणी ही योजना राबवली जात आहे. राज्यातील सरासरी 26 जिल्ह्यांमध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली असून या सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उर्वरित 75 टक्के पिक विमा ची रक्कम देण्यात येणार आहे.
केंद्र सरकारने 30 एप्रिल 2024 रोजी काढलेल्या जाचक परिपत्रकाविरुद्ध महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या हितासाठी राज्य शासनाने मोठे पाऊल उचलले आहे. राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीकडे याचिका दाखल करण्यात आले असून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करत आहे.
राज्यात या तारखेला पडणार जोरदार पाऊस! शेतकऱ्यांना मिळणार मोठा दिलासा, पंजाबराव डख यांनी सांगितली तारीख
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठे निर्णय
देशभरात लोकसभा निवडणुका पार पडल्या आहेत. निवडणुकीच्या काळात आचारसंहिता लागू असल्या मुळे सरकारला या संदर्भात कोणताही निर्णय घेता आला नाही. त्याचबरोबर महाराष्ट्रात पुढील पाच ते सहा महिन्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून उर्वरित 75 टक्के पिक विमा शेतकऱ्यांना वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. शासनाच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
6 thoughts on “Crop Insurance: उर्वरित 75 टक्के पिक विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा! पात्र शेतकऱ्यांची यादी पहा”