या सात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार नाही अग्रीम पिक विमा..! केंद्रीय समितीने 7 जिल्ह्याची मागणी फेटाळली? पहा सविस्तर माहिती


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Crop Insurance Claim: नमस्कार शेतकरी मित्रांनो, 2023 चा अग्रीम पिक विमा विषयी महत्त्वाची बातमी घेऊन आलो आहोत. 2023 चा पिक विमा वेळोवेळी चर्चेत राहिला आहे. महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यात अग्रिम पिक विमा मिळाला आहे बऱ्याचश्या मंडळात देखील अग्रिम पिक विमा मिळाला आहे. परंतु काही असे जिल्हे आणि मंडळ आहेत त्यांना अजून हि अग्रीम पिक विमा मिळाला नाही.

राहिलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लवकरात लवकर अग्रीम पिक विमा मिळावा यासाठी शेतकरी मागणी करत आहेत. यातच एक मोठी बातमी समोर आली आहे. लातूर, हिंगोली, अमरावती, नाशिक, सोलापूर, सातारा आणि अहमदनगर या जिल्ह्यामध्ये आगरीन पिक विमा केंद्र सरकारच्या तांत्रिक सल्लागार समितीने फेटाळला आहे.

केंद्रीय कृषी विभागाचे अतिरिक्त सचिव मेरड यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती होती. सात जिल्ह्यातील अग्रीम पीक विमा प्रयोगानंतर दिला जाईल असे या समितीकडून सांगण्यात आले आहे. समितीने दिलेल्या आहवालानुसर राज्य सरकारने फक्त दुष्काळ आणि प्रजण्यामानाचा विचार लक्षात घेऊनच आग्रिन पीक विमा देण्याचा निर्णय घेतलेला आहे. परंतू पिक विमा साठी योजनेच्या मार्गदर्शक तत्वेच पलान केले नसल्यामुळे या समितीने हा निकाल पिक विमा कंपनीच्या बाजूने जाहीर केला आहे.

हे पण वाचा: या राशीच्या लोकांसाठी 26 जानेवारीचा दिवस रहाणार खास, जाणून घ्या आजचे राशीभविष्य.

Crop Insurance Claim

केवळ प्रजन्यमानाचाच विचार केला असून कंपन्याचा विचार केलेला नाहीये असं म्हणत कंपनीने केंद्रीय तांत्रिक सल्लागार समितीकडे याविषयी तक्रार केली होती आणि समितीने अहवाल देण्यापूर्वी हिंगोली, सातारा, सोलापूर, अमरावती, लातूर, अहमदनगर या जिल्ह्यांना अग्रीम पिक विमा हा पीक काढणी प्रयोगा नंतर दिला जाईल असा अहवाल दिला आहे.

या रिलायन्स, एचडीएफसी, ओरिएंटल, इन्शुरन्स, एसबीआय इन्शुरन्स या कंपनीचा समावेश आहे. समितीने दिलेल्या अहवालानुसार या सात जिल्ह्यांना अग्रीम पिक विमा काढणी प्रयोगा नंतर देण्यात येणार आहे. या कंपनीच्या म्हणण्यानुसार केंद्र सरकारने जे काही प्रोटोकॉल्स असतील ते फॉलो केले नाहीत त्यामुळे कंपनीने केंद्रीय कृषी विभागाच्या अतिरिक्त सचिव प्रमोद कुमार मेरडा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सात जिल्ह्यातील अग्रिम पिक विमा मिळणेबाबत जो प्रस्ताव होता. त्याला नाकार देऊन पीक काढणी प्रयोगांतरच पिक विमा देण्यात येईल असे सांगितले आहे.

राज्यात यंदा 40 तालुके आणि 1240 महसूल मंडळात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. तुम्हाला माहीतच आहे खरीप हंगामामध्ये पाऊस कमी झाला त्यामुळे शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे जिल्हाधिकारी पातळीवर शेतकऱ्यांना आगरीन पिक विम्याची गरज असल्यामुळे त्यांना पिक विमा देण्यात यावा असे दावे कंपन्याकडे करण्यात आले होते परंतु काही कंपनीने दावे मंजूर केले पण काही कंपन्यांनी तांत्रिक सल्लागार समितीकडे याविषयी तक्रार केली आणि पिक विमा देण्यास नाकार दिला.

हे पण वाचा:-

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी 23 हजार शेततळ्यांना मंजुरी..! पहा कोणते शेतकरी आहेत पात्र/अपात्र?

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

Leave a Comment

error: Content is protected !!