पिक विम्याची रक्कम, ही शेतकऱ्यांना लवकरात लवकर द्या नाहीतर…!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Crop Insurance: नमस्कार शेतकरी मित्रांनो, या वर्षांमध्ये अवकाळी व मानसून या संकटामुळे शेतकरी फारच जास्त प्रमाणावर खचून गेलेला आहे. या पिकाच्या नुकसानीसाठी जाहीर केलेली, ही जी पीक विम्याची उर्वरित 75 टक्के रक्कम ही तातडीने शेतकऱ्यांच्या बँक अकाउंट मध्ये जमा करा. ही मागणी आपल्या भारत कृषक समाजातर्फे महाराष्ट्र राज्याचे चेअरमन डॉ. प्रकाश मानकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केलेली आहे.

पीक विम्याच्या दिलेल्या निवेदनामध्ये असे म्हटले आहे, की खरीप या हंगामाच्या सुरुवातीलाच कमी व अधिक पावसाचे आणि अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या कापूस पिकाचे सोयाबीन, तूर इत्यादी इतर पिकांचे नुकसान झालेले आहे. आणि अशा काही ठिकाणी पुन्हा पेरणी करून ही हे पिके काढले गेलेली नाही.

सोयाबीन या पिकाचे उत्पन्न फारच कमी झाल्यामुळे सोयाबिन चा पहिला बहर हा पूर्णपणे आता वाया गेलेला आहे. पावसाने सुद्धा दगा दिला. शेतकऱ्यांनी वाढवलेल्या या किमतीत खते आणि बियाणे व कीटनाशकांवर भरपूर खर्च करून सुद्धा या मालाचे उत्पन्न कमी मिळाले आहे. म्हणून, यावर्षी मजुरीचा दर सुद्धा वाढलेला होता. शेतकऱ्यांनी आता या पैशाची जुळवाजुळवत करून पिके वाचवण्याचे फार मोठे प्रयत्न केले होते.

आता काही थोड्या प्रमाणामध्ये उत्पन्न झाले. पण आता या पिकाला बाजार भाव नसल्याने शेतकऱ्यांनी गुंतवणूक जी केलेली होती, ती केलेली रक्कम ही मिळणार नाही. आणि या सर्व गोष्टींचा शासनाने पुरेपूर विचार करून शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची घोषणाही केलेली आहे. Crop Insurance

तर पिक विमा रकमेची 25 टक्के रक्कम आगाव दिलेली होती. मात्र, आता आपल्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये 50 % च्या आत आणेवारी जारी केलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये शिल्लक असलेली पिक विम्याची 75 टक्के रक्कम ही लवकरात लवकर आता जमा करावे. अशी मागणी आपले डॉक्टर. मानकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कृषी मंत्री धनंजय मुंडे आणि पिक विमा कंपनीकडे केलेली आहे.

हे पण वाचा:- शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी..! कर्जमाफीसाठी पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर? यादीत तुमचे नाव पहा

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

Leave a Comment

error: Content is protected !!