Crop insurance : राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की शेतकऱ्यांना नुकसान भरपाई अग्रीम 25 टक्के रक्कम ही दिवाळीच्या देण्याचा निर्णय घेण्यात आलेला असून अशी माहिती त्यांनी दिलेली आहे. प्रसार माध्यमाचे बोलत असताना यावेळी आमदार संग्राम जगताप व आमदार अरुण काका जगताप आदी यावेळी उपस्थित होते.
मोठ्या प्रमाणामध्ये पावसाचा खंड पडल्यामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेले आहे. एक रुपयांमध्ये पिक विमा हा मिळत नाही, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. असे विचारल्यानंतर राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे म्हणाले की ज्याच्या मंडळामध्ये 25% पेक्षा कमी जिथे 21 दिवसांचा पावसाचा खंड पडलेला आहे,असे अधिसूचित मंडळ आहेत.
याची माहिती घेतलेली आहे काही मंडळांच्या संदर्भामध्ये विमा कंपन्यांच्या अडचणी होत्या त्या सुद्धा मुख्यमंत्र्यांनी सोडवले असल्याचे ते सांगितले आहे. तसेच त्यांनी विमा कंपन्यांच्या प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक सुद्धा घेतलेली आहे. शेतकऱ्यांना अग्रीम रक्कम ही दिवाळीपर्यंत देण्यात येईल असे यावेळी धनंजय मुंडे यांनी सांगितले.
लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावरती 25% अग्रीम पिक विमा रक्कम दिवाळीच्या आतपर्यंत जमा होऊ शकते अशी शक्यता आहे .