Thursday

13-03-2025 Vol 19

कापूस साठवून ठेवावा की विकावा? तज्ञांनी केले त्यांचे मत व्यक्त ! वाचा सविस्तर माहिती

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Cotton Price Today : सरासरी पेक्षा कमी पाऊस झाल्याने कापसाच्या उत्पादनामध्ये घट झाली आहे. म्हणावे तसे उत्पन्न शेतकऱ्यांचे झाले नाही. कमी पाऊस झाले नाही दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली आहे. तर काही ठिकाणी सरकारने दुष्काळी सवलती देखील लागू केले आहेत.

दरवर्षीप्रमाणे यावर्षी कापसाला चांगला भाव मिळेल हे अपेक्षणी शेतकऱ्यांनी घरामध्ये कापूस साठवून ठेवला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये कापसाच्या किमती हमीभावापेक्षा कमी आहेत त्यामुळे अनेक शेतकरी आता आपला माल विकायचा की भाव सुरळीत होण्याची वाट पाहायची याचा विचार करत आहेत.

(अशाच नवीन नवीन माहितीसाठी आजच आमचा नंबर 70571 47283 तुमच्या गावातील व्हाट्सअप ग्रुप मध्ये ॲड करा )

मागील तीन वर्षांपूर्वीचे विचार जर केला तर कापसाला प्रतिक्विंटल सुमारे दहा हजार रुपये असा दर होता. यामुळे शेतकऱ्यांनी इतर पिकापासून कापसाकडे जाण्यास प्रवृत्त केले होते. तथापि गेल्या वर्षापासून किमती घसरत आहेत. आणि सध्या 6500 ते 7500 प्रतिक्विंटल असा भाव मिळत आहे.

गेल्या वर्षीचा विचार जर केला तर गेल्या वर्षी उत्पन्न शेतकऱ्यांचे चांगले झाले होते आणि कापसाला अपेक्षित असा भाव मिळाला होता. डिसेंबर जानेवारी 2021-22 मध्ये दर आठ हजार ते आठ हजार दोनशे प्रति क्विंटल होते. परंतु 2022-23 मध्ये याच कालावधीत किंमतीत घसरण झाली 6500 ते 7500 च्या किमतीमध्ये दर आहेत.

सरासरी पेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे यंदा कापसाच्या उत्पादनावर परिणाम झालेला आहे. नोव्हेंबर मध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे कापसाचे उत्पादनाचे गुणवत्ता खराब झाली आहे. हा कापूस कमी दराने विकावा लागत आहे.

सरकारने ठरवून दिलेल्या हमीभाव 7000 विचार तुम्ही चांगला दर्जाचा कापूस ही सध्या सुमारे 6500 ते 7500 प्रतिक्विंटल ने विकला जात आहे. उच्च निव्वस्त खर्चामुळे कापूस लागवड तोट्याचे ठरत असल्याचा दावा शेतकरी करत आहे.

जर असाच कापसाला भाव मिळत असेल तर, शेतकरी कापूस पिकाकडे दुर्लक्ष करण्याचे संकेत आहेत. खर्च वाढला असतानी भावामध्ये झालेली घसरन शेतकऱ्यांसाठी चिंताजनक आहे. भाव वाढतील अशा अशांनी अनेकांनी आपला कापूस घरामध्ये ठेवला आहे. तथापि दर दीर्घकाळ टिकून राहिल्याने पुढील नुकसान टाळण्यासाठी शेतकरी कमी किमतीमध्ये विक्री करण्यास भाग पाडले जाऊ शकते. बाजारभावातील स्थिती पाहता शेतकऱ्यांसमोर सर्वात मोठे आव्हान उभे आहे.

Rushikesh

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *