Cotton Market Today: नमस्कार शेतकरी मित्रांनो, कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारी बातमी समोर येत आहे. कापसाच्या बाजारभावात वाढ होताना दिसून येत आहे. यावर्षीच्या कापूस हंगाम्यात महिन्यापासून सात हजाराच्या आत असणाऱ्या कापसाच्या बाजारभावात 200 ते 300 रुपयांनी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
गेल्या आठवड्यापर्यंत 6850 रुपये प्रतिक्विंटल पर्यंत भाव होता. मात्र आज झालेल्या बाजार पेठेत थोड्या प्रमाणात का होईना तेजी आल्याचे चित्र दिसून येत आहे. बुधवारी 7400 रुपये कापसाला भाव मिळाल्याने आगामी काळात याबाबत काय स्थिती असेल याकडे शेतकऱ्यांचे लक्ष आहे.
मानवत तालुक्यातील एकूण 23 हजार 643 हेक्टरवर कापसाची लागवड केली होती. त्या खालोखाल 15 हजार 847 हेक्टरवर सोयाबीनची पेरणी केली होती. त्याच बरोबर तूर 2 हजार 127 हेक्टरवर, मूग 775 हेक्टर, उडीद 198 हेक्टर, मका 149 हेक्टर, खरीप ज्वारी 134 हेक्टर, बाजरी 80 हेक्टर वर, तीळ 23 हेक्टर क्षेत्रावर पेरणी करण्यात आली आहे.
कापसाची काढणीचे शिवारात सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. ज्या शेतकऱ्याची कापसाची वेचणी पूर्ण झाली असे शेतकरी किरकोळ खर्चासाठी कापूस विक्री करत असल्याचे समोर येत आहे. 14 नोव्हेंबर पासून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या लिलावा द्वारे कापसाच्या खरेदी विक्रीला सुरुवात झाली आहे. पहिल्या दिवशी कापसाला सरासरी 7400 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. यानंतर मात्र पंधरा दिवसात कापसाच्या दरात 100 ते 150 रुपयाची घसरण झाली. संपूर्ण डिसेंबर महिन्यात 7050 ते 7000 रुपया पर्यंत भाव मिळाला.
Cotton Market Today:
जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात दर सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल वर घसरले होते. फेब्रुवारीच्या पहिल्या पंधरा दिवसात कापसाचे दर जशाचे तसे स्थिर होते. मात्र 17 फेब्रुवारीला 300 रुपयाची वाढ दिसून आली यामुळे कापसाला 7200 रुपये सरासरी दर मिळाला आहे. 7250 तर बुधवारी 7280 सरासरी दर मिळाला. भाव कमी जास्त होत असल्याने आपला कापूस विक्री करण्याचा निर्णय घेतलेला शेतकऱ्यांना गत दोन दिवसापासून फायदा होत असल्याचे चित्र कापूस लिलावात दिसून येत आहे.
CCI ची कटकट बंद..!
चालू वर्षी केंद्र शासनाने कापसाला 7020 रुपये प्रति क्विंटल हमीभाव जाहीर केला होता. कापसाचे दर हमीदराच्या खाली आल्यानंतर CCI ला सुरुवात केली होती. मात्र पिक पेयची कटकट असल्याने शेतकऱ्यांना CCI ला कापूस विक्री करता येत नव्हता. सध्याच्या स्थितीत कापसाला हमीदरापेक्षा 200 ते 300 रुपये जास्त दर मिळत असल्याने CCI चि कटकट बंद झाली आहे.
बुधवारी मिळाला 7400 रुपये बाजार भाव
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या छत्रपती शिवाजी महाराज बाजार समितीत बुधवारी झालेल्या कापूस लिलावात कापसाला सर्वात जास्त दर 7400 मिळाला आहे. तर सरासरी दर 7300 रुपये मिळाला आहे. यावेळी लिलावात जिनिंग व्यापारी जुगल किशोर काबरा, रामनिवास सारडा, सागर मुंदडा, मयंक अग्रवाल इत्यादी व्यापारी सहभागी होते.
हे पण वाचा :- शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी..! सव्वा लाख शेतकऱ्यांना 42 कोटी पिक विमा वाटप, पहा तुम्हाला मिळणार का?
One thought on “शेतकऱ्यांना मोठा दिलासा कापुस बाजार भावात तेजी..! आज कापसाचे दर 400 रुपयांनी वाढले”