शेतकऱ्यांचा कापूस संपल्यावर कापसाच्या भावात मोठी वाढ! पहा आजचा कापुस बाजार भाव

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Cotton Market Price: नमस्कार शेतकरी मित्रांनो, आता खरीप हंगाम चालू झालेला आहे. मागील वर्षीचा कापूस शेतकऱ्यांनी विकले आहेत. शेतकऱ्यांकडे कापूस संपल्यानंतर बाजार भाव तेजी असल्याची पहायला मिळत आहे. मानवत शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये झालेल्या लिलावात कापसाला जास्तीत जास्त आठ हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल एवढा दर मिळाला आहे.

यंदाच्या हंगामात सात महिन्याच्या कालावधीत तिसऱ्या वेळेस दर आठ हजाराच्या पार गेले आहेत. शेतकऱ्यांकडे कापूस संपल्यानंतर बाजारभावात तेजी आल्याचे दिसून येत आहे. यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 14 नोव्हेंबर पासून लिलावा द्वारे कापसाचे खरेदी विक्री सुरुवात झाली आहे. पहिल्या दिवशी कापसाला सरासरी सात हजार चारशे रुपये दर मिळाला होता. कापसाच्या दरात 100 ते 150 रुपयाची घसरण दिसून आली आहे. पूर्ण डिसेंबर महिन्यात सात हजार पाचशे ते सात हजार पर्यंत भाव मिळत होता.

जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कापसाचे दर 6800 पर्यंत खाली घसरले होते. फेब्रुवारीच्या पहिल्या पंधरा दिवसात भावाची स्थिती जशी आहे तशीच होती. तर उर्वरित तेरा दिवसात कापसाच्या भावात थोडी तेजी पाहायला मिळाली होती. फेब्रुवारीतील शेवटच्या दिवशी सात हजार सातशे रुपये भाव झाला होता.

मार्च महिन्यातील पहिल्या पंधरा दिवसात कापसाचे भाव आठ हजारावर गेले होते. 16 मार्च दरम्यान कापसाचे भाव पुन्हा 200 ते 300 रुपयांनी घसरले. मात्र दोन एप्रिल पासून पुन्हा कापसाचे भाव आठ हजारापर्यंत गेले. दोन एप्रिल ला सरासरी सात हजार आठशे ते सात हजार नऊशे रुपये दर मिळत होता.

मात्र त्यानंतर पुन्हा बाजारभावात मोठी घसरण पाहायला मिळाली. एक ते पंधरा मे दरम्यान सात हजार 450 ते 750 रुपये दरम्यान भाव मिळत होता. 26 जून पासून कापसाचे दर आठ हजाराच्या वर गेले होते. शेतकऱ्यांकडे कापूस संपल्यानंतर बाजारपेठेत कापसाचे भाव वाढत चालल्याचे दिसून आले आहे. Cotton Market Price

मागील पूर्ण हंगामात फक्त तीनदा कापूस गेला आठ हजाराच्या वर

नोव्हेंबर पासून यापूर्वीच्या कापूस सांगा मला सुरुवात झाली होती. या हंगामात कापसाचे दर सात ते 13 मार्ग दरम्यान आठ हजारावर असल्याचे चित्र पाहायला मिळत होते. यानंतर पुन्हा कापसाच्या भावात घसरण पाहायला मिळाली. यानंतर एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात पुन्हा कापसाचे दर आठ हजाराच्या वर गेले होते.

मात्र पुन्हा एकदा कापसाच्या बाजारभावात 400 ते 500 रुपयाची घसरण पाहायला मिळाली होती. 26 जून ते 28 जून दरम्यान पुन्हा कापसाला आठ हजाराच्या वर दर मिळाला होता. त्यानंतर पुन्हा एकदा कापसाच्या बाजारभाव घसरण झाले होती. मात्र आता पुन्हा एकदा कापूस 8000 च्या वर गेल्याचे पाहायला मिळत आहे. संपूर्ण हंगामात तिसऱ्यांदा कापूस आठ हजाराच्या वर गेला आहे.

नवीन कापसाची लागवड झाली तरी जुन्या कापसाची विक्री चालूच

यंदाच्या खरीप हंगामात पेरणी झालेल्या कापसाचे उगवण होऊन खुरपणी चालू असल्याचे चित्र शेत शिवारात दिसून येत आहेत. दुसरीकडे गेल्या वर्षीच्या खरीप हंगामातील कापूस पावसाळ्याच्या जून महिना संपत आला असला तरी आता शेतकरी लीलावाद्वारे कापूस विक्री करत असल्याचे चित्र मार्केटमध्ये दिसून येत आहे.

मागील दहा दिवसाचे कापसाचे दर

18 जून7540
19 जून7500
20 जून7600
21 जून7650
22 जून7750
23 जून7900
24 जून7975
25 जून8050
26 जून7950
27 जून

शेतकऱ्यांचा कापूस लागवडीकडे ओढ

गेल्या वर्षीच्या हंगामात कापसाला कमी भाव मिळाला असला तरी ठोक उत्पन्न म्हणून शेतकऱ्यांना कापूस हेच पीक परवडते. यामुळे यावर्षी देखील शेतकऱ्यांची कापूस लागवडीवर मोठ्या प्रमाणात ओढ पाहायला मिळत आहे. सर्वात जास्त खर्च असला तरी चांगला भाव मिळेल यावर शेतकऱ्यांनी कापसाची लागवड मोठ्या प्रमाणात केली आहे. यावर्षी भाव गेल्यावर्षीपेक्षा जास्त राहतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

अश्याच नवनविन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

(Disclaimer | वरील दिलेली माहिती ही प्रसारमाध्यमांच्या आधारे आहे आणि सरकारी वेबसाईटच्या आधारे आहे याबाबत आमची टीम कुठलाही दावा करत नाही)

Leave a Comment

error: Content is protected !!