Cotton market price | गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यातील बाजार समितीमध्ये वाढवताना दिसत आहे. मागच्या काही दिवसांपूर्वी सर्व बाजार समिती कमाल सात हजार रुपये प्रतिक्विंटल कमी दर मिळत होता. मात्र राज्यात कापसाचा भाव वाढण्याचे संकेत दिसू लागली आहेत. गेल्या काही दिवसापूर्वी बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा बाजार समितीमध्ये कापसाला सात हजार पाचशे रुपये इतका दर मिळाला होता. तर अन्य बाजार समितीमध्ये कापसाच्या घरामध्ये सुधारणा झाली नव्हती. परंतु आता कापसाच्या दराने उसळी घेतल्याने शेतकऱ्यांमध्ये आणखी दरवाढीची अपेक्षा निर्माण झाली आहे.
कुठे मिळाला सर्वाधिक दर
राज्यातील कापूस दर जाणून घेण्यापूर्वी आजच आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा जेणेकरून तुम्हाला शेतीविषयक बाजार भाव माहिती लवकरात लवकर मिळेल.
अकोला जिल्ह्यामधील बोरगाव मंजू बाजार समितीमध्ये आज प्रति क्विंटल मागे जवळपास दीडशे रुपयांनी वाढ झालेली दिसून येत आहे. तसेच आज बाजार समितीमध्ये १२२ क्विंटल कापसाचे आवक झालेली आहे इथे कमाल 7340 रुपये ते किमान 7000 रुपये तसेच सरासरी सात हजार 100 रुपये प्रतिक्विंटल एवढा दर मिळाला आहे.
तसेच वर्धा जिल्ह्यामधील सिंधू बाजार समितीमध्ये आज 2950 क्विंटल कापसाचे आवक झालेली आहे. इथे कमाल 7300 ते किमान सहा हजार सातशे रुपये तसेच सर्वसाधारण सात हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल एवढा दर मिळाला आहे. तसेच अकोला बाजार समितीमध्ये 111 क्विंटल कापसाचे आवक झालेली आहे. कमाल 7030 ते किमान 6780 रुपये प्रति क्विंटल एवढा दर मिळाला असून सर्वसाधारण सहा हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल एवढा दर मिळाला आहे.
दरामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता
बऱ्याच दिवसापासून कापसाचे दर हमीभाव पेक्षा कमी आहे. त्यामुळे शेतकरी वर्गांमधून मोठी चिंता व्यक्त होत आहे. अशातच एक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. देशपातळीवरील बाजारात कापूस दराने उसळी घेतली आहे. कापसाला वाढलेल्या मागणी आणि चांगला कापूस बाजारामध्ये उपलब्ध होत नसल्याने यामुळे दर वाढ झाली असल्याचे कापूस व्यापारी जानकरांकडून सांगितले जात आहे.
इतकेच नाही तर आणखी आठवडाभर कापूस दरामध्ये आणखी वाढ होऊन ते सरासरी सात हजारांचा टप्पा ओलांड पुढे सरकतील अशी शक्यता जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आणखी दरामध्ये वाढ झाल्यास त्याचा निश्चित कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.