Cotton Market Price : शेतकऱ्यांसाठी आनंदाची व महत्त्वाची बातमी आहे. शेतकऱ्याचे पांढरे सोने खरेदी करायला सुरुवात झालेली असून शेतकऱ्यांना काही मार्केटमध्ये आठ हजार रुपये भाव मिळत आहे. परंतु दिवाळीपूर्वी हे सोने कवडी मोलदारांमध्ये विकले जात होते. पण आता पुन्हा पांढऱ्या सोन्याला तेजी आली आहे.
दिवाळी झाल्यानंतर बाजारपेठ पुन्हा सजले आणि कापसाच्या बाजार भाव आता पुन्हा वाढ झालेली आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांमध्ये मोठे समाधानाचे वातावरण तयार झालेला पाहायला मिळत आहे.
दिवाळीनंतर दरात वाढ झालेली असल्याने आता कुठेतरी शेतकऱ्यांची दिवाळी सुरू झाले असल्याचे दिसून येत आहे. खरंतर दिवाळी पुरी कापसाला फक्त 6500 ते 7000 रुपये प्रति क्विंटल इतका दर भाव मिळत होता.
विशेष म्हणजे हंगामाच्या अगदी सुरुवातीलाच कापसाचे बाजार भाव राज्यातील जवळपास सर्वच कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हमीभावापेक्षा कमी होते.
परंतु आता दिवाळीनंतर पांढरे सोने चमकलेले दिसून येत आहे कापसाचा बाजार भाव आता आठ हजार रुपयांच्या घरामध्ये पोहोचला आहे.
कापसाचे आगार म्हणून संपूर्ण देशात ख्यातनाम असलेला अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काल कापसाला 7 हजार आठशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल एवढा भाव मिळालेला आहे. म्हणजेच भाव जवळपास 8000 च्या घरामध्ये पोहोचला आहे.
कापसामध्ये भाव वाढत नसल्याने परिणामी शेतकरी गेल्या काही अनेक दिवसांपासून चिंतेमध्ये होता परंतु या भावामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठा दिलासा मिळालेला आहे. भावात सुधारणा झाली असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
शिवाय आगामी काळामध्ये कापसाचा भरात आणखी वाढ होईल अशी आशा देखील शेतकऱ्यांना आता वाटू लागलेली आहे. कारण यंदा राज्यामध्ये सरासरी पेक्षा कमी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे प्रमाणामध्ये नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना आशा लागलेली आहे की, 10 हजार रुपयांच्या आसपास भाव मिळेल.
मात्र कापूस बाजार असलेली ती जी भविष्यात कायम राहील का याबाबत आत्तापासूनच काही सांगता येणार नाही. असे मत बाजार अभ्यासकांनी यावेळी सांगितले.
पण कापसाचे बाजार भाव आठ हजारांच्या घरामध्ये पोहोचले आहे.भविष्यात भावा आणखी वाढणार आहे. कष्टाने पिकलेल्या पांढऱ्या सोन्याला काय भाव मिळतो हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.