Cotton Market News | राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे. बघायचं झालं तर गेल्या काही दिवसांपासून कापसाचे बाजार भाव दाबात होते परंतु शेतकऱ्यांनी पांढरे सोने म्हणून ओळखले जाणारा कापूस पुन्हा एकदा चमकणार आहे. परंतु याच्या मागचे कारण काय हे आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.
मागच्या तीन-चार दिवसापूर्वी बाजारामध्ये कापसाचे भावामध्ये सुधारणा होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा कापसाचे बाजार भाव दहा हजारांच्या पार जाणार अशी आशा शेतकऱ्यांना लागली आहे.
कापूस हे महाराष्ट्र उत्पादित होणारे नदी पीक आहे याचे उत्पादन मराठवाडा विदर्भ खानदेश या भागांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घेतली जाते या शेतकऱ्यांचे या पिकावरती अर्थकारण अवलंबून आहे.
मात्र यंदा हंगामाच्या सुरुवातीला कापसाचे भाव दबावत असताना शेतकऱ्यांना याचा मोठा प्रमाणामध्ये फटका बसला आहे. सध्या बाजारामध्ये ऑफिसचा स्वभाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी बऱ्याच दिवसापासून त्यांचा माल घरामध्ये साठून ठेवला आहे. परंतु शेतकऱ्यांना सध्या पैशांची निकड होती यामुळे हंगाम सुरू झाल्यानंतर लगेच कापूस विक्री करावा लागत आहे.
सरकारने यंदा हंगामाच्या सुरुवातीला कापसाला सात हजार वीस रुपये असा मी भाव जाहीर केला होता पण शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दर मिळत असल्याने शेतकरी वर्ग मोठ्या अडचणी मध्ये सापडला होता. परंतु आता बाजारात मधली स्थिती हळूहळू बदलू लागली आहे.
म्हणजे आता पांढरे सोने हळूहळू चमकू लागले आहे. 16 फेब्रुवारी रोजी यवतमाळ जिल्ह्यामध्ये पांढरकवडा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाला तब्बल नऊ हजार 675 रुपये प्रति क्विंटल एवढा दर मिळालेला आहे. विशेष म्हणजे या हंगामा मधील सर्वाधिक दर आहे.
परिणामी कापूस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आता पुन्हा भाव वाडीचे अशी आशा निर्माण झाली आहे. आणि शेतकऱ्यांमध्ये आता दहा हजार रुपये प्रति क्विंटल एवढा दर मिळेल आणि केलेल्या कष्टाला यश मिळेल. राज्याच्या इतर बाजार समितीचा विचार जर केला तर तिथे सुद्धा थोडीशी बाजार मध्ये सुधारणा होताना दिसत आहे.
तसेच तज्ञांनी देखील याबाबत मोठे वक्तव्य केले आहे. कापसाचे भाव येत्या काळामध्ये आठ हजाराच्या पार जातील असे मत स्पष्ट केले आहे. आता येत्या काळामध्ये पांढरे सोने पुन्हा एकदा चमकणार का याकडे पाहण्यासारखे राहणार आहे.