Cotton Market | कापूस उत्पादन शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. बाजार समितीमध्ये कापसाची आवक झाल्यानंतर कापसाच्या भावात सुधारणा होऊ शकते.
आज झालेले लिलावा मध्ये कापूस बाजार भाव मध्ये वाढ पाहायला मिळाली. कालच्या बाजारभावाच्या तुलनेमध्ये आज कापसाचे भाव वाढले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये देखील कापसाचे भाव वाढत आहेत. आता देशातही कापसाचे बाजार भाव वाढणार का ? असा प्रश्न शेतकऱ्यास समोर पडला आहे.
वैदे बाजार पाचशे रुपये निवडून 58 हजार रुपये पर्यंत पोहोचले आहेत. वायदे बाजार मध्ये वाढ झाली परंतु बाजार समितीमध्ये कापसाचे दर दबावतच आहेत. आज झालेली लावा मध्ये सहा हजार पाचशे ते सात हजार दोनशे रुपये इतका दर मिळाला आहे. तज्ञांच्या मते बाजारामध्ये कापसाची आवक झाल्यानंतर भावात ही सुधारणा होऊ शकते. असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापूस दरामध्ये वाढ झाली आहे. लवकरच आवक झाल्यानंतर भारतात कापसाचे दरही वाढतील असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने राज्यामध्ये फारसे उत्पादन झाले नाही. त्यामुळे उत्पादनामध्ये ही घट झाली आहे. शेतकऱ्यांना अपेक्षित असा भावही मिळत नसल्याने शेतकरी मोठ्या संकटामध्ये सापडलेला आहे.
कापूस कधी विकावा
परंतु पुढील काळामध्ये कापसाचे भाव कसे राहतील किंवा कापसाचे भाव वाढतील का याबाबत अभ्यासकांनी मोठे वक्तव्य केले आहे त्यांनी दिलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांनी चांगला कापूस 7500 रुपये क्विंटल च्या कमी विकू नये असे मत व्यक्त केले आहे. व या मुलाखती त्यांनी बोलत असताना असे सांगितले की बाजारातील तज्ञांनी दिलेल्या माहितीवर जास्त काळ अवलंबून राहू नये. कापसाचे भाव वाढत असल्यास तात्काळ शेतमालाची विक्री करावी.