Cotton Market | कापसाचे भाव वाढत नसल्याने शेतकरी अक्षरशा हतबल झाला आहे. कष्टाने पिकवलेल्या मालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढत चाललेली आहे.
परंतु आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार जर केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाला चांगला दर मिळत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाचे भाव वाढत आहे. मिळालेल्या माहितीनुसार देशात हि भाव वाढतील का? परंतु देशातील परिस्थिती काय? कापसाचे भाव वाढतील का व कधीपासून वाढणार? या सर्व प्रश्नांची उत्तर आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. हा लेख शेवटपर्यंत वाचा..!
(शेती विषयक बातम्या, शासकीय योजना, महत्वाची माहिती मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आमचा WhatsApp 70571 47283 नंबर तुमच्या गावातील ग्रुप मध्ये ऍड करा)
देशभरासह महाराष्ट्रतात ही कापूस पिकाची मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन घेतले जाते. मराठवाडा, विदर्भ तसेच खानदेश या विभागात कापूस पिकावर अर्थकारण अवलंबून आहे. यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने कापूस पिकामध्ये उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. याच कारणाने कापूस दहा हजार पार जाईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती.
परंतु कष्टाने पिकवलेल्या कापसाला योग्य भाव मिळत नसल्याने, शेतकरी अक्षरशः हदबल झाला आहे. बळीराजाला वाटते की एक पुन्हा एकदा कर्जबाजारी होणार या भीतीने शेतकरी टोकाचे पाऊल उचलतात. शेतीला केलेला खर्चही निघत नसल्याने शेतकरी वर्गांमधून मोठी चिंता व्यक्त होत आहे. परंतु अशातच आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाचे भाव वाढत आहे. परंतु देशांमध्ये भाव कधी वाढणार हा प्रश्न शेतकऱ्यांसाठी उभा राहिला आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात जरी कापसे भाव वाढत असले तरी देशामध्ये हीच परिस्थिती कायम आहे. सरकारने जाहीर केलेला हमीभाव अपेक्षा कमी भावाने कापूस विक्री होत आहे. परंतु येत्या काळामध्ये भाव वाढतील असे जाणकारांचे म्हणणे आहे. परंतु शेतकऱ्यांनी कापूस कधी विकावा हे तज्ञांनी सांगितले आहे.
परंतु पुढील काळामध्ये कापसाचे भाव कसे राहतील किंवा कापसाचे भाव वाढतील का याबाबत अभ्यासकांनी मोठे वक्तव्य केले आहे त्यांनी दिलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांनी चांगला कापूस 7500 रुपये क्विंटल च्या कमी विकू नये असे मत व्यक्त केले आहे. व या मुलाखती त्यांनी बोलत असताना असे सांगितले की बाजारातील तज्ञांनी दिलेल्या माहितीवर जास्त काळ अवलंबून राहू नये. कापसाचे भाव वाढत असल्यास तात्काळ शेतमालाची विक्री करावी.