Cotton Market | कापूस उत्पादक शेतकरी अक्षरशा हदबल झाले आहेत. अजूनही कापूस भाव मध्ये घसरन होत असल्याने, शेतकरी संकटामध्ये सापडला आहे. साहेब आमच्या कापसाला भाव कधी मिळणार? आम्ही घरात साठवून ठेवला कापूस कधी विकायचा? अशी चर्चा गावांमध्ये होत आहे. गेल्या हंगामामध्ये कापसाला दहा हजार रुपये प्रति क्विंटल पेक्षा अधिक भाव मिळाला होता.
यावर्षी देखील असाच जर राहील यापेक्षा बहुतांश शेतकऱ्यांनी खरीप हंगामामध्ये कापूस पिकाची लागवड केली. परंतु यावर्षी उलट झालं, सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने, राज्यामध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामध्ये नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फरले.
यंदा जास्त उत्पन्न ही झाले नाही व खर्च अधिक झाला. शेतकऱ्यांना त्यांच्या कापसाला दहा हजार इतकी अपेक्षा नसून नऊ हजार किंवा आठ हजार तरी दर मिळावा अशी मागणी शेतकरी वर्गांमधून होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
बाजारामध्ये सध्या कापसाची आवक सरासरी आहे. तरीही महाराष्ट्र मध्ये कापसाला विविध बाजार समितीमध्ये 7100 इतका दर मिळत आहे. मात्र या दराने विक्री करूनही शेतीला केलेला खर्च निघत नसल्याने शेतकरी सांगत आहेत.
परंतु पुढील काळामध्ये कापसाचे भाव कसे राहतील किंवा कापसाचे भाव वाढतील का याबाबत अभ्यासकांनी मोठे वक्तव्य केले आहे त्यांनी दिलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांनी चांगला कापूस 7500 रुपये क्विंटल च्या कमी विकू नये असे मत व्यक्त केले आहे. व या मुलाखती त्यांनी बोलत असताना असे सांगितले की बाजारातील तज्ञांनी दिलेल्या माहितीवर जास्त काळ अवलंबून राहू नये. कापसाचे भाव वाढत असल्यास तात्काळ शेतमालाची विक्री करावी.