Cotton Market | कपस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी येत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये कापसाच्या दरामध्ये वाढ होत आहे. राज्याच्या भावात काय दर मिळतो हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. बऱ्याच दिवसापासून बाजार भाव दाबावत होते. फेब्रुवारी महिन्यात काही दिवसांपासून कापुस दरात सुधारणा होत आहे. तर सध्याला काय दर मिळतो आपण जाणून घेणार आहोत.
आज राज्याच्या काही बाजारामध्ये कापसाला सात हजार ते सात हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल असा दर मिळत आहे. तसेच सर्वसाधारण 7300 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळत आहे. मागच्या काही दिवसांपासून बाजाराचे भाव सुधारणा होत असताना शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या भोळ्या भाबड्या शेतकऱ्याला आता कापसाचे भाव दहा हजार पाच जातील अशी आशा निर्माण झाली आहे.
जागतिक बाजारातील स्थिती
या आठवड्यात जागतिक कापूस बाजारामध्ये तेजीचे वातावरण तयार झाले आहे. 90 ते 92 सेंट प्रतिपाउंड रुईचे भाऊ एक डॉलर दोन सेंड च्या आसपास आहेत. आजचा भाव १.१६ डॉलर पाउंड पाऊस आहे. या हिशोबाने जागतिक बाजारात 70 से 72 रुपये प्रति खंडी रुईचे भाव होतात.
- एक पाउंड रुईचा भाव १.१६ डॉलर
- २.२ पौंड म्हणजे एक किलो
- १.१६x 2.2 = २.५५२ डॉलर प्रति किलो
- ३५० किलो रुई म्हणजे एक खंडी
- २.५५२x ३४० = ८६७.६८ डॉलर
- सध्या एक डॉलर म्हणजे ८३ रुपये आहे
- ८६७.६८x८३= ७२०१०.४४ रुपये प्रतीक खंडी
- दोन वर्षांपूर्वी जागतिक बाजारात एक लाख रुपये खंडी असे रुईचे भाव झाले होते. ते आता 70 ते 72 हजार रुपये झालेले आहेत. रशियाई कुरियन इजराइल गाझा या युद्धामुळे निर्यात प्रभावित झाली होती. त्यामुळे आजही समुद्री वाहतूक मध्ये खर्च वाढला आहे.
भारत सरकारने काल कापूस आयत वरचा अकरा टक्के आयात कर शून्य केला आहे. भारतातून 2011-2012 साली 80 लाख गाठींची निर्यात करण्यात आली होती. यावर्षी पण चाळीस-पन्नास लाख गाठींची निर्यात होऊ शकते.
या निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारने कापूस निर्यातीला वाहतूक सबसिडी देण्याची घोषणा करावी व देशाच्या रुई बाजारात 70 ते 75 हजार रुपये खंडीचे रुई चे भाव टिकून राहतील अशी व्यवस्था केली तर शेतकऱ्यांना 8000 ते साडेआठ हजार रुपये भाव मिळण्याची शक्यता आहे.