Cotton Market | पांढरे सोने म्हणून ओळखले जाणारे कापूस पीक महाराष्ट्र मध्ये मोठ्या प्रमाणात लावली जातात. याचे उत्पादन प्रामुख्याने विदर्भ मराठवाडा खान्देश या भागामध्ये घेतली जातात. बरेच दिवसापासून कापूस पिकाचे बाजार भाव दबावत आहेत. मुख्य काही बाजार समितीमध्ये काय भाव मिळतो हे जाणून घेणार आहोत.
आजचे कापसाचे बाजार भाव(Today’s market price of cotton)
सिंधी सेलू बाजार समितीमध्ये आज 1550 क्विंटल कापसाची आवक झाली इथे किंमत कमी सहा हजार सहाशे ते जास्तीत जास्त 7750 तसेच सर्वसाधारण सहा हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल एवढा दर मिळाला आहे. फुलंब्री बाजार समितीमध्ये १४८ क्विंटल कापसाची आवक झाली आहे.
इथे कमीत कमी सहा हजार सहाशे पन्नास रुपये तसेच जास्तीत जास्त सहा हजार आठशे रुपये इतका दर मिळाला आहे. वर्धा बाजार समितीमध्ये आज 1910 क्विंटल कापसाचे आवक झाले आहे. तसेच इथे कमीत कमी 6250 जास्तीत जास्त सात हजार ते सर्वसाधारण सहा हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.
येवला बाजार समितीमध्ये 187 कुंटल कापसाचे आवक झाले आहे. तसेच कमीत कमी सहा हजार वीस ते जास्तीत जास्त 6650 रुपये प्रतिक्विंटल एवढा दर मिळाला आहे तसेच सर्व साधारण सहा हजार तीनशे दहा रुपये इतका दर मिळाला आहे.
हिंगणघाट बाजार समितीमध्ये आज 52 कुंटल कापसाचे आवक झाली. इथे कमीत कमी सहा हजार ते जास्तीत जास्त सहा हजार सातशे रुपये इतका दर मिळाला आहे तसेच सर्वसाधारण सहा हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल एवढा दर मिळाला आहे.
नेर परसोपंत बाजार समितीमध्ये 39 क्विंटल कापसाची आवक झाली आहे तसेच इथे कमीत कमी पाच हजार आठशे ते जास्तीत जास्त पाच हजार आठशे इतका दर मिळाला आहे तसेच सर्व साधारण पाच हजार आठशे इतका दर मिळाला आहे.