राज्यात मराठा समाजाच्या 57 लाख नोंदी सापडल्या आहेत, मात्र कोणत्या विभागात किती नोंदी? पहा संपूर्ण सविस्तर माहिती


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Check Caste Certificate Online: नमस्कार मित्रांनो, आज आपण मराठा समाजाच्या कुणबी नोंदी बद्दल सर्व सविस्तर माहिती पाहणार आहोत. विशेष म्हणजे सर्वाधिक कुणबी नोंदी विदर्भात सापडले आहेत. त्यात प्रामुख्याने अमरावती आणि नागपूर मध्ये एकूण 35 लाख 57 हजार 435 नोंदी सापडल्या आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर महाराष्ट्र सरकारने शिंदे समितीची नियुक्ती केली आहे. त्यामुळे राज्यात तब्बल 57 लाख मराठा कुणबी नोंदी सापडले आहे असा दावा केला जात आहे. या दरम्यान कोणत्या विभागात किती नोंदी मिळाल्या याची देखील आकडेवारी समोर आली आहे. विशेष म्हणजे सर्वाधिक कुणबी नोंदी विदर्भात सापडल्या असून अमरावती व नागपूर मध्ये 35 लाख 57 हजार 435 नोंदी सापडल्या आहेत.

महाराष्ट्र राज्यात एकूण 57 लाख नोंदी सापडल्या असून, 38 लाख 97 हजार 391 प्रमाणपत्राचे वाटप केली गेले आहे. विशेष म्हणजे कमी नोंदी मराठवाड्यात सापडल्या आहेत. मराठवाड्यात एकूण 32 हजार 91 नोंदी सापडले आहेत. मराठवाड्यात 23 हजार 290 प्रमाणपत्र वाटण्यात आले आहेत. विशेष म्हणजे मराठवाड्यात काही गावांमध्ये एकही नोंद सापडली नाही. दुसरीकडे विदर्भ पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेशात मात्र कुणबी प्रमाणपत्राच्या नोंदी मोठ्या प्रमाणात सापडल्या आहेत.

हे पण वाचा : कुणबी प्रमाणपत्र कसे काढायचे? त्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहे? पहा सर्व सविस्तर माहिती

कोणत्या विभागात किती नोंदी सापडल्या? | Check Caste Certificate Online

  • कोकण: 7 लाख 53 हजार 50 नोंदी सापडल्या आहेत.
  • पुणे: 6 लाख 7 हजार 620 नोंदी सापडल्या आहे.
  • नाशिक: 7 लाख 91 हजार 50 नोंदी सापडल्या आहेत.
  • छत्रपती संभाजीनगर: 32 हजार 100 नोंदी सापडल्या आहेत.
  • अमरावती: 26 लाख पंधरा हजार 220 नोंदी सपडल्या आहे.
  • नागपूर: 9 लाख 42 हजार 210 नोंदी सापडल्या आहेत.

मराठवाड्यात किती नवी सापडल्या आहेत?

  • छत्रपती संभाजी नगर: 3482
  • जालना: 2810
  • परभणी: 2477
  • हिंगोली: 316
  • धाराशिव: 3310
  • लातूर: 310
  • बीड: 9750
  • नांदेड: 1730

नांदेड जिल्ह्यातील 600 लोकांना प्रमाणपत्र देण्यात आले आहे

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी चालू केलेल्या आंदोलनातून मराठा समाजाला कुणबी नोंदी चा फायदा मिळत आहे. नांदेडमध्ये 600 जणांना याचा लाभ मिळाला आहे. शासनाच्या सुधारित आदेशानंतर सहाशे जणांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात आले आहे. असे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे. नांदेड जिल्ह्यात गेल्या चार महिन्यात कुणबी नोंदी 1728 सापडल्या आहेत. हे देखील जिल्हाधिकारी साहेबांनी सांगितले आहे.

बीड जिल्ह्यात 68 टक्के सर्वेक्षण

मराठा आणि खुल्या प्रवर्गाच्या सर्वेक्षणाला वेग आला आहे. बीड जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 68% मराठा आणि खुल्या प्रवर्गाचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे. शहरी आणि ग्रामीण भागामध्ये 23 जानेवारीपासून या सर्वेक्षणाला सुरुवात झाली होती. बीड जिल्ह्यामध्ये सर्वेक्षणाला सुरुवात झाल्यानंतर पहिल्याच दिवशी तांत्रिक अडचणीमुळे सर्वेक्षण बंद झाले होते मात्र आता या सर्वेक्षणाला वेग आला असून सर्वेक्षण करणारे कर्मचारी दारोदारी जाऊन खुल्या प्रवर्गाचे सर्वेक्षण करत आहे. या सर्वेक्षणासाठी 182 प्रश्नाचे प्रश्न आले असून, यातील काही प्रश्न किचकट असल्याचे सर्वेक्षण अधिकाऱ्याने सांगितले आहे.

हे पण वाचा:-

💁‍♂️👇

कुणबी प्रमाणपत्र कसे काढायचे? त्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहे? पहा सर्व सविस्तर माहिती

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

Leave a Comment

error: Content is protected !!