कुणबी प्रमाणपत्र 1 मिनिटात काढा? कोणती कागदपत्र आवश्यक आहे? पहा सविस्तर माहिती

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Cast Certificate Apply Online: नमस्कार मित्रांनो, मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रातील सकल मराठा समाजासाठी सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावे यासाठी मोठ्या आंदोलन उभे केले होते. नोव्हेंबर महिन्यात जरांगे पाटील यांनी आपले उपोषण सरकारच्या आश्वासनानंतर स्थगित केले होते. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे म्हणजे ओबीसीतून आरक्षण मिळेल अशी मागणी जरांगे पाटील यांनी आंदोलनातून केली.

आंदोलनाच्या सुरुवातीला मराठवाड्यातील मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे अशी मागणी घेऊन आंदोलन सुरू करण्यात आले होते. मात्र यानंतर संपूर्ण राज्यातील मराठा बांधवांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावी अशी मागणी जरांगे पाटलांनी या आरक्षणांमधून केली आहे. सरकारने त्यांची मागणी मान्य करून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे.

कुणबी प्रमाणपत्र नक्की काढतात कसे?

सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले मात्र कुणबी प्रमाणपत्र नक्की काढायचे कसे? यासंदर्भात अजूनही संभ्रम आहे. कुणबी जात प्रमाणपत्र मिळवण्यासाठी 13 ऑक्टोबर 1967 रोजी किंवा त्याच्या आधी जन्म झालेला तुमचा रक्त नातेसंबंधातील नातेवाईक म्हणजे तुमचे वडील/ चुलते/ आत्या, आजोबा, पंजोबा, खापर पंजोबा, वडीलाचे चुलते/ आत्या, आजोबाचे चुलते /आत्या, पणजोबाचे चुलते/ आत्या, खापर पंजोबाचे चुलते /आत्या यापैकी कुठलाही एक नातेवाईकाचे कुणबी जात सिद्ध करणारा जातीचा पुरावा असणे आवश्यक आहे.

जातीचा पुरावा मिळवण्यासाठी काय करावे लागेल? | Cast Certificate Apply Online

रक्त संबंधातील नातेवाईकांचा प्राथमिक शाळा प्रवेश निर्गम उतारा किंवा शाळा सोडल्याचा दाखला काढून त्यावर कुणबी नोंद आहे का ते तपासा. स्वतंत्र्यापूर्वीच्या काळात गावातील प्रत्येकाच्या जन्म मृत्यूची नोंद त्याच्या जातीसह कोतवाल बुक किंवा गाव नमुना नंबर 14 मध्ये ठेवली जात होती. पूर्वी या नोंदी धर्म तहसील कार्यालयात पाठवल्या जायच्या एक डिसेंबर 1963 पासून कोतवाल पद महसूल विभागाकडे देण्यात आले त्यानंतर हे काम ग्रामपंचायतच्या ग्रामसेवकाकडे देण्यात आले.

आपला रक्त संबंधातील नातेवाईकांचा जन्म किंवा मृत्यू झालेल्या गावाशी संबंधित तहसील कार्यालयात अर्ज करून त्यांच्या नावाच्या गाव नमुना नंबर 14 किंवा कोणत्या लोकांची नक्कल मागणी करावी त्यात कुणबी नोंद आहे का ते तपासावे.

आपल्या काळातील जुनी महसूल कागदपत्र पैकी वारस नोंदी, जमीन वाटप नोंदी, ७/१२ उतारे, ८ अ उतारे, फेरफार, खरेदी खत, भाडे पत्र, सातबारा अमलात येण्याआधी असणारे क.ड.ई. पत्र, सूड पत्र, खासरा पत्रक, हक्क पत्र किंवा तत्सम इतर कुठल्याही महसुली कागदपत्रांपैकी कुणबी जातीचा उल्लेख आहे का ते शोधावे आणि असेल तर ते कागदपत्र काढून घ्यावे.

रक्त संबंधातील नातेवाईक शासकीय किंवा निम शासकीय नोकरी असल्यास सर्विस बुकच्या पहिल्या पानावर संबंधित कार्यालयाने त्या नातेवाईकांची कुणबी जात नोंद केलेली असल्यास त्याचा स्वाक्षरी केलेला उतारा घ्यावा. रक्त संबंधातील नातेवाईकाने अगोदरच कुणबी जात प्रमाणपत्र काढले असेल तर त्याचे कुणबी जात प्रमाणपत्र आणि समाज कल्याण खात्याची छाननी समितीने वेद ठरवलेले त्याचे कुणबी जात पडताळणी प्रमाणपत्र हे सुद्धा जातीचा पुरावा म्हणून चालेल.

पुढे वाचा…

हे पण वाचा:- सोने खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी..! आज सोने खूपच स्वस्त झाले आहे, आता 10 ग्रॅम सोन्याचे नवीन दर जाणून घ्या

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

Leave a Comment