Agriculture News | शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! परदेशामध्ये जाण्याची सुवर्णसंधी, विविध देशांनी तयार केलेले शेतीविषयक नियंत्रण व त्याविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आणि शेतीत उत्पादन वाढवण्यासाठी कृषी विभागाने प्रदेशात अभ्यास दौरे करण्याची संधी उपलब्ध केलेली आहे. ज्या शेतकऱ्यांना प्रदेशामध्ये जायचे आहे त्यांनी कृषी अधिकारी कार्यालयात जाऊन अर्ज सादर करावेत असे आव्हान जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी केले आहेत.
शेती निगडित विविध घटकांबाबत जगात वेगवेगळे प्रयोग केले जातात. विकसित होत असलेले तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी कृषी विस्तार कार्यालयात कार्यक्रमाच्या अंतर्गत प्रयत्न करण्यात येत आहे. शेतकऱ्यांना आर्थिक निर्भर व शेती विषयक माहिती मिळवण्यासाठी हे कार्यक्रम राबवले जातात. जगभरामध्ये विविध प्रकारचे तंत्रज्ञान विकसित झाले आहे. ते तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी हे कार्यक्रम राबवण्यात येत आहे.
याचाच भाग म्हणजे २०२३-२४ मध्ये जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे परदेशामध्ये अभ्यास दौरे नियोजन करण्यात आलेले आहेत. ज्या इच्छुक शेतकऱ्यांना जाण्याची इच्छा असेल त्यांनी कृषी अधिकारी कार्यालयामध्ये जाऊन अर्ज करता येणार आहेत.
या योजनेमध्ये जर्मनी, स्पेन, फ्रान्स, स्विझर्लंड, न्युझीलँड, नेदरलँड, वेतनाम, मलेशिया, थायलंड, पेरू, ब्राझील, चिली, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर या देशांची निवड करण्यात आलेली आहे.
या दौऱ्यासाठी शासनाकडून सर्व घटकातील शेतकऱ्यांसाठी 50 टक्के रक्कम किंवा अधिक एक लाख रुपये प्रति लाभार्थी यापैकी कमी असेल ती रक्कम अनुदानित करण्यात येणार आहे.
या दौऱ्यासाठी शेतकऱ्यांचे त्यांचे बँक खाते आधार क्रमांक लिंक असणे आवश्यक आहे. निवड झाल्यानंतर दौऱ्याचे शंभर टक्के रक्कम प्रवास कंपनीकडे आगाऊ स्वस्त भरावा लागणार आहे. दौऱ्यानंतर ती रक्कम अनुदानित स्वरूपामध्ये खात्यावर जमा करण्यात येईल.
दौरासाठी असणाऱ्या अटी
- सर्वप्रथम म्हणजे लाभार्थी या स्वतः शेतकरी असणे आवश्यक आहे.
- शेतकऱ्याचे नावे सातबारा व आठ अ उतारा असावा.
- उत्पन्नाचे मुख्य साधन शेती असल्याचे स्वयंघोषित प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
- अर्ज करण्याच्या वेळेस आधार कार्डची प्रत द्यावी
- शेतकरी किमान बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- वय पंचवीस ते साठ वर्षे असावे
- शेतकरी वैद्य पारपत्रधारक असावा
- शेतकरी शासकीय निमशासकीय सरकारी खाजगी संस्थेमध्ये नोकरीत नसावा.
- वकील डॉक्टर सीए अभियंता कंत्राटदार नसावा.
- शेतकरी शारीरिक दृष्ट्या तंदुरुस्त असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे.