Agriculture News | शेतकऱ्यांना पावसाचा खंड, अतिवृष्टी, दुष्काळ, शेत पिकावर रोग अशा अनेक संकटांना तोंड देत शेती करावे लागती. 2020 मध्ये कोरोनामुळे अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसला. त्यामध्ये सर्वात जास्त बळीराजांने अर्थव्यवस्थेला मोठा आधार दिला होता. 2019-20 आणि 2020-21 या आर्थिक वर्षामध्ये कृषी क्षेत्रामध्ये सरासरी 5.1 टक्क्यांनी वाढ झाली होती. बळीराजांनी चांगली कामगिरी केली नसती तर या दोन वर्षांमध्ये अर्थव्यवस्थामध्ये एक टक्क्याहून अधिक घसरण झाली असती.
याच दरम्यान केंद्रातील मोदी सरकार शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेऊ शकते. कृषी क्षेत्राला मदत देण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन काही उपाय योजना जाहीर करू शकतात. एक फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार आहे हा अंतिम अर्थसंकल्प असेल पण अर्थमंत्री कृषी सारख्या महत्त्वाच्या क्षेत्रासाठी मोठा निर्णय घेऊ शकते.
अर्थसंकल्पनात शेतकऱ्यांसाठी होणार मोठा निर्णय
2024 चा शेवटचा अर्थसंकल्प जाहीर होणार आहे. यामध्ये कृषी क्षेत्रासाठी मोठा निर्णय होण्याची शक्यता नाही असे जाणकारांनी म्हटले आहे. परंतु लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकार शेतकरी वर्गासाठी मोठी घोषणा करेल अशी अपेक्षा आहे. पंतप्रधान कृषी सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना देणारे आर्थिक मदत सरकार वाढू शकते, अशी सध्या चर्चा सुरू आहे.
सध्या देशभरामध्ये शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी केंद्र सरकार शेतकऱ्याला वर्षभरात सहा हजार रुपयांची आर्थिक मदत करते. हीच मदत अर्थसंकल्पानात आठ हजार रुपये वाढवण्याची घोषणा करू शकते. 2019 च्या अंतरीम बजेटमध्ये ही योजना सुरू करण्याची घोषणा करण्यात आली होती.
मोदी सरकार खरच शेतकऱ्यांसाठी शेवटच्या अर्थसंकल्पनात शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मोठा निर्णय घेणार का याकडे पाहण्यासारखे राहणार आहे.